धाड पडताच 500 रुपयांची बंडले खिडकीतून फेकली

धाड पडताच 500 रुपयांची बंडले खिडकीतून फेकली

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे चक्क नोटांचा पाऊस पडला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. सरकारी इंजिनीयर असलेल्या वैकुंठ नाथ सारंगी याच्या घरावर दक्षता विभागाने टाकलेल्या धाडीत दोन कोटींची रोकड सापडली. धाड पडल्याने घाबरून गेलेल्या वैकुंठनाथने पाचशे रुपयांची बंडलं खिडकीतून बाहेर फेकायला सुरुवात केली. ओरिसातील ग्रामीण विकास विभाग दक्षता विभागाच्या रडारवर आहे.

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती कमवल्याबद्दल या विभागाचा मुख्य अभियंता असलेल्या वैकुंठ नाथ सारंगी याच्याशी संबंधित सात ठिकाणी दक्षता विभागाने अत्यंत नियोजनबद्धरीत्या धाडी टाकल्या. सारंगीच्या केवळ घरातच नव्हे तर भुवनेश्वर, कटक, पुरी, बालासोर येथील ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 50 हून अधिक अधिकारी आणि 26 पोलिसांचा समावेश होता. नोटांची बंडलं बघून आजूबाजूचे लोक थक्क झाले. काही लोकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर दक्षता पथकाने बंडले गोळा करून बॅगेत भरली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;