‘मिस वर्ल्ड’चा मुकुट कोणाच्या डोक्यावर! हैदराबादेत रंगणार आज महाअंतिम सोहळा

‘मिस वर्ल्ड’चा मुकुट कोणाच्या डोक्यावर! हैदराबादेत रंगणार आज महाअंतिम सोहळा

‘मिस वर्ल्ड 2025’ स्पर्धेचा महाअंतिम निकाल उद्या 31 मे 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे. मिस वर्ल्ड कोण होणार असून जागतिक सौंदर्यवतीचा मुकुट कोणाच्या डोक्यावर ठेवला जाणार आहे, हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल. राजस्थानच्या कोटा या शहरातील नंदिनी गुप्ता हिच्याकडे तमाम हिंदुस्थानींच्या नजरा लागल्या आहेत. अवघ्या 21 वर्षीय नंदिनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. नंदिनीने 19 व्या वर्षी फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केलेला आहे. त्याआधी तिने ‘मिस राजस्थान’सुद्धा आपल्या नावावर केलेला आहे. त्यामुळे ‘मिस वर्ल्ड’ किताब नंदिनीच्या डोक्यावर येईल, असे अनेकांना वाटत आहे.

नंदिनीने एका मुलाखतीत सांगितले की, 10 वर्षांची असताना तिने मिस इंडिया बनण्याचे स्वप्न पाहिले होते. 2023 मध्ये हे स्वप्न खरे करून दाखवले आहे. नंदिनी गुप्ता हिचा जन्म 2004 साली कोटामध्ये झाला. तिने नुकतेच मुंबईतील लाला लजपत राय कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली आहे. नंदिनी गुप्ता ही अभिनेत्री प्रियांका चोप्राला आपले आदर्श मानते. प्रियांकाने 2000 साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. नंदिनीला डान्स करणे, चित्रपट पाहणे आणि प्रवास करणे खूप आवडते. ग्रँड फिनाले शनिवारी हैदराबादेत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला सायंकाळी साडे सहा वाजता सुरुवात होणार आहे. या इव्हेंटला लाईव्ह सुद्धा पाहता येऊ शकते. सोनी लीव किंवा www.watchmissworld.com या वेबसाईटवरून हा कार्यक्रम पाहता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;