मोबाईलच्या प्रकाशात चार महिलांची प्रसूती

मोबाईलच्या प्रकाशात चार महिलांची प्रसूती

उत्तर प्रदेशात बेरुअरबारी प्राथमिक आरोग्य केंद्रात चार महिलांची मोबाईलच्या प्रकाशात प्रसूती केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव बर्मन म्हणाले, जिल्हा मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेल्या बेरुअरबारी येथील सरकारी आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री चार गर्भवती महिलांची मोबाईल फोनच्या लाईटद्वारे प्रसूती करण्यात आली. प्राथमिक चौकशीतून असे दिसून येतंय की, बेरुअरबारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील (पीएचसी) ट्रान्सफॉर्मर तीन दिवसांपूर्वी जळाला. आरोग्य केंद्रात जनरेटर आणि डिझेल उपलब्ध असूनही हा प्रकार घडला. सोमवारी रात्री प्रसूती झालेल्या या महिलांची ओळख पटली आहे. राजपूर येथील नीतू देवा, अछूही येथील मंजू देवी, अदार येथील पिंकी देवी आणि अपायल येथील रजिया खातून अशी महिलांची नावे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;