‘माझ्या आयुष्यातील हिरो आता..’ अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्यानंतर निवेदिता सराफ यांची खास पोस्ट

‘माझ्या आयुष्यातील हिरो आता..’ अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्यानंतर निवेदिता सराफ यांची खास पोस्ट

मराठी तसेच हिंदी चित्रपसृष्टीत, मालिका आणि नाटकांमध्येही आपल्या खणखणती अभिनयाने , गेल्या कित्येक वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 27 मे रोजी पद्म पुरस्कार 2025 च्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांचा सन्मान झाला. त्यावेळी कला, सामाजिक कार्य आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी अनेक नामवंत व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचवेळी अशोक सराफ यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं.

अतिशय अभिमानास्पद अशा या गौरवानंतर मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, मान्यवरांनी, राजकारणी, लेख, सर्वच क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींनी अशोक मामांचे अभिनंदन करत त्यांना या सन्मानासाठी शुभेच्छाही दिल्या. मात्र या सर्वात एका खास पोस्टने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशोक सराफ यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदित सराफ यांनीही सोशल मीडियावर दोघांचा एक सुंदर, सुहास्य मुद्रेचा फोटो पोस्ट करत अशोक सराफ यांच्यासाठी स्पेशल पोस्टही केली आहे. पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांनी अशोक सराफ यांचे खास अंदाजात कौतुक केलं.

माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान

निवेदित सराफ यांनी इन्स्टाग्रामवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर ही स्पेशल पोस्ट केली आहे. पद्म पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर, काल निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो त्यांच्या अकाऊंटवर टाकला आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, तसेच जाकीट घातलेले अशोक मामा आणि त्यांच्या शेजारी केशरी रंगाच्या साडीत सुरेख दिसणाऱ्या, सुहास्य मुद्रेने फोटोसाठी पोझ देणाऱ्या निवेदिता सराफ… दोघांचाही हा फोटो पाहून आपल्या चेहऱ्यावरही नकळत हसू येतं. या फोटोसोबत निवेदिता यांनी काही खास ओळीही लिहील्या असून अशोक सराफ यांचं अभिनंदनही केलं.

” हा क्षण शब्दात मांडता येणार नाही असा…
तुझा प्रत्येक प्रवास, प्रत्येक टप्पा साक्षी आहे तुझ्या मेहनतीचा, तुझ्या समर्पणाचा.
माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान!🎖
माझा अभिमान अनंत पटीने वाढला!! खूप खूप अभिनंदन… ” असे कौतुकाचे शब्द लिहीत त्यांनी या फोटोत अशोक सराफ यांना टॅग केलंय.

 

जानेवारी महिन्यातच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावेळीही माध्यमांशी बोलताना निवेदिता सराफ यांनी आनंद व्यक्त केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सोनाली बेंद्रेचे आलिशान घर, आतून खूपच सुंदर; काळ्या रंगाच्या भिंतीपासून ते चांदीचं देवघर सगळंच युनिक सोनाली बेंद्रेचे आलिशान घर, आतून खूपच सुंदर; काळ्या रंगाच्या भिंतीपासून ते चांदीचं देवघर सगळंच युनिक
डायनिंग एरिआ: हे सोनाली बेंद्रेच्या घराचा डायनिंग एरिआ आहे. या ठिकाणी पांढऱ्या आणि राखाडी रंगांचा उत्तम वापर करण्यात आला आहे....
सलमान खानच्या कडेवर दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध अभिनेता अन् सलमानच्या नायिकेचा नवरा, ओळखलंत का कोण?
जेवण बनवण्याच्या या 5 पद्धतीमुळे कॅन्सर होण्याची शक्यता? दीपिकाची ती चुकीची पद्धत बेतली जीवावर, तुम्ही टाळू शकता
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणतात, मला माहिती नाही!
हिंदुस्थानच नाही तर आमची रणनीतीही बदलली; सिंगापूरमध्ये CDM जनरल अनिल चौहान यांनी पाकड्यांना सुनावले
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकड्यांना दणका; सुरब शहरावर मिळवला ताबा
हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय; हिंदी आमची ‘लाडकी बहीण’, मिंधे आमदार प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळं