फ्लर्टिंगसाठी अभिनेत्रीचा नंबर मागितला का? आरोपांवर अखेर सुदेश म्हशीलकर यांनी सोडलं मौन

फ्लर्टिंगसाठी अभिनेत्रीचा नंबर मागितला का? आरोपांवर अखेर सुदेश म्हशीलकर यांनी सोडलं मौन

झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ताराची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची पिसाटने ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुदेश यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठवल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने त्यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांनंतर पाच दिवसांनी अखेर सुदेश यांनी मौन सोडलं आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी यासंदर्भात भलीमोठी पोस्ट लिहित आपली बाजू मांडली आहे. त्याचसोबत त्यांनी पोलीस तक्रारीची प्रतसुद्धा या पोस्टमध्ये जोडली आहे. प्राचीला ते मेसेज कोणी केले आणि कसे केले हे मला माहीत नाही, असं सुदेश यांनी म्हटलंय.

सुदेश म्हशीलकर यांचं स्पष्टीकरण-

‘खरंतर मी या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मीडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.

1. हा मेसेज खरंच मीच केला का?

तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा, कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाऊंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाऊंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे. त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

2. अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप

मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं असं (हसण्याचे इमोजी) दिसेल. जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं. पण इथे उलट मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अशाप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.

3. फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?

माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता, पण तिने घेतलाच नाही.

4. पाच दिवस उत्तर का दिलं नाही?

मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि माझी मुलंही याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो. कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.

5. प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?

माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहीत नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.

6. बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी

‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीलासुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात’, असे मुद्देश सुदेश यांंनी मांडले आहेत. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudesh Mhashilkar (@sudeshmhashilkar)

नेमकं काय आहे प्रकरण?

‘तुझा नंबर पाठव ना. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, कसली गोड दिसतेयस’, असे मेसेज सुदेश यांनी केल्याचा स्क्रीनशॉट प्राचीने शेअर केला होता. प्राचीला तिच्या फेसबुक मेसेंजरमध्ये 7 एप्रिल रोजी सुदेश यांचा आणखी एक मेसेज आला होता. त्याचाही स्क्रीनशॉट तिने शेअर केला होता. त्यात सुदेश यांनी म्हटलं होतं, ‘खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली, वाह!’ प्राचीने हे स्क्रीनशॉट शेअर करत सुदेश यांच्याकडे जाहीर माफीची मागणी केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;