चंद्रपुरात भाजपमध्ये पक्षांतर्गत धुसफुस; हंसराज अहिरांची नाराजी सुधीर मुनगंटीवारांना भोवणार

चंद्रपुरात भाजपमध्ये पक्षांतर्गत धुसफुस; हंसराज अहिरांची नाराजी सुधीर मुनगंटीवारांना भोवणार

विदर्भातील चंद्रपूर मतदारसंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभा लढण्याची इच्छा नसताना उमेदवारी दिली आहे. त्यातच या मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार हंसराज अहिर यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षांतर्गत धुसफुस सुरू झाली आहे. अहिरांची नाराजी मुनगंटीवार यांना भोवण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

मुनगंटीवार आणि अहिर यांच्यामध्ये फारसे सख्य नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यातील सुप्त संघर्ष चव्हाटय़ावर आला होता. हंसराज अहीर हे केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि चार टर्म खासदार असूनसुद्धा त्यांचा मोदी लाटेत मागील निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे त्यांच्या ते चांगलेच जिव्हारी लागले होते. यासंदर्भात एक जाहिरातच वृत्तपत्रात प्रसिद्ध करून यामध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मते कमी पडली याची माहिती त्यांनी दिली होती. मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी पडली होती. त्यामुळे अहिर आणि त्यांचे समर्थक आधीच मुनगंटीवार यांच्यावर नाराज आहेत. त्यात मुनगंटीवार यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आल्याने  अहिर आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते मुनगंटीवार यांच्या मागे उभे राहतील का,असा प्रश्न आहे.

अहिर समर्थकांना प्रचारात सक्रिय करण्याचे आव्हान

लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांच्यासाठी गांधी चौकात आशीर्वाद सभा झाली. यावेळी वणी, आर्णीचे आमदार तसेच भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, अहिर आणि त्यांचे समर्थक उपस्थित राहिले नाहीत. अहिर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते भाजपच्या ओबीसी सेलचे प्रमुख पदाधिकारी आहेत. भाजपला चंद्रपूरच्या जागेवर विजयी व्हायचे असेल तर अहिर यांची समजूत काढून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचे आव्हान भाजप नेत्यांपुढे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;