कपूर घराण्याची न झालेली सून, आता सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाला करतेय डेट?

कपूर घराण्याची न झालेली सून, आता सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाला करतेय डेट?

कपूर घराण्यात काही महिन्यांपूर्वीच सनईचौघडे वाजले होते. राज कपूर यांची मुलगी रीमा जैनचा मुलगा आदर जैनने बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याला संपूर्ण कपूर कुटुंबीय उपस्थित होते. बालमैत्रीण आलेखा अडवाणीशी लग्न करण्यापूर्वी आदर हा अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. तारा आणि आदर हे एकमेकांशी लग्न करणार, तारा कपूर कुटुंबाची सून होणार अशा जोरदार चर्चा होत्या. परंतु काही कारणास्तव दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. त्यानंतर आता तारा सुतारियाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एण्ट्री झाल्याचं कळतंय. गेल्या दोन महिन्यांपासून ती एका नवोदित अभिनेत्याला डेट करतेय. हा नवोदित अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडियाला डेट करतेय.

वीर पहाडियाने ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. तर तारा सुतारिया ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वीच वीर त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत होता. अभिनेत्री सारा अली खानला तो डेट करत असल्याचं म्हटलं गेलं होतं. विशेष म्हणजे ‘स्काय फोर्स’ या पहिल्याच चित्रपटात त्याने सारासोबत काम केलंय. परंतु सारा आणि वीरचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Veer Pahariya (@veerpahariya)

मिळालेल्या माहितीनुसार तारा आणि वीर यांच्यात काही महिन्यांपूर्वीच चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात होतंय. हे दोघं एकमेकांना ओळखण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघं काही वेळा एकमेकांसोबत डेटला गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच तारा आणि वीरला एका रेस्टॉरंटमध्ये पाहिलं गेलं होतं. डिनरनंतर तारा तिच्या काही मैत्रिणींसोबत बाहेर पडली आणि थोड्या वेळाने वीरसुद्धा तिथून निघाला. याआधी लॅक्मे फॅशन वीकमध्ये तारा आणि वीरने एकत्र रॅम्पवॉक केला होता.

तारा आणि आदर यांचं 2023 मध्ये ब्रेकअप झालं. त्यानंतर आदरने ताराचीच मैत्रीण आलेखा अडवाणीशी यावर्षी लग्न केलं. या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. मेहंदीच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणात आदरने अप्रत्यक्षपणे एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख केल्याचं म्हटलं गेलं होतं. “आजपर्यंत मी फक्त टाइमपास केला, पण तुझ्यावर मी खरं प्रेम करतो”, असं तो होणारी पत्नी आलेखाला उद्देशून म्हणत होता. परंतु आदरने हा टोमणा ताराला मारल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. यावरून अनेकांनी त्याला ट्रोलसुद्धा केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;