‘गोपी बहु’ पुन्हा प्रेग्नंट, डिलिव्हरीच्या 6 महिन्यांतच गुड न्यूज? फोटो पाहून चाहते अवाक्!

‘गोपी बहु’ पुन्हा प्रेग्नंट, डिलिव्हरीच्या 6 महिन्यांतच गुड न्यूज? फोटो पाहून चाहते अवाक्!

‘साथ निभाना साथिया’ या गाजलेल्या मालिकेत ‘गोपी बहु’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. देवोलीनाने लग्नानंतर काही काळ ब्रेक घेतला आहे. यादरम्यान तिने एका मुलालाही जन्म दिला. जरी सध्या ती छोट्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडिया आणि व्लॉगद्वारे ती चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. 2022 मध्ये तिने जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी लग्न केलं होतं. या दोघांच्या आंतरधर्मीय लग्नाची बरीच चर्चा झाली होती. लग्नाच्या दोन वर्षांनंतर देवोलीना आई झाली. सहा महिन्यांपूर्वीच तिने बाळाला जन्म दिला. आता बाळंतपणाच्या सहा महिन्यांतच ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती शाहनवाजसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळेच ती चर्चेत आली आहे. देवोलीनाचे हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये तिच्या ‘गुड न्यूज’ची चर्चा होऊ लागली आहे. इतकंच नव्हे तर या फोटोंनंतर देवोलीनाने तिच्या व्लॉगमध्येही ‘गुड न्यूज’चा उल्लेख केला. त्यामुळे ती पुन्हा आई होणार की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये देवोलीनाने बॉडी फिटेड ड्रेस घातला असून यामध्ये तिचा बेबी बंप पहायला मिळतोय. डिलिव्हरीच्या सहा महिन्यांत ती गरोदर कशी राहिली, असा सवालही काही जण करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

या चर्चांवर अखेर देवोलीनाने मौन सोडलं आहे. ‘टेली टॉक’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “असं काहीच नाहीये. माझ्या डिलिव्हरीला फक्त सहाच महिने झाले आहेत. लोक काहीही विचार करतात आणि त्यावरून चर्चा करू लागतात. मी माझ्या व्लॉगमध्ये गुड न्यूजबद्दल बोलले, पण ते माझ्या प्रेग्नंसीबद्दल नाही. गुड न्यूज दुसरी कुठलीही असू शकते. प्रत्येक वेळी त्याचा अर्थ गरोदरपणाशी कसा जोडला जाऊ शकतो? आधीच एका गुड न्यूजने माझे केस प्रमाणाच्या बाहेर गळू लागले आहेत. मी माझ्या व्लॉगमध्ये ज्या गुड न्यूजविषयी बोलले, ते माझ्या घराबद्दल आहे. आम्ही लवकरच घर घेणार आहोत. परंतु सर्वकाही ठीक झाल्यावर मी त्याची रितसर घोषणा करेन.”

देवोलीनाने तिच्या व्लॉगमध्ये कामावर कधी परतणार याचंही उत्तर दिलं आहे. “माझा मुलगा अजून लहान आहे. त्याला माझी सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे अजून काही काळ मी ब्रेकवरच असेन. परंतु सर्व गोष्टी जुळून येताच मी पुन्हा कामाला सुरुवात करेन”, असं तिने स्पष्ट केलं. देवोलीना आणि शाहनवाज यांनी त्यांच्या मुलाचं नाव जॉय असं ठेवलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;