Lok sabha election 2024 – आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास 100 मिनिटांत कारवाई
लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास 100 मिनिटांत कारवाई केली जाणार आहे. आचारसंहिता उल्लंघन होत असल्याचे दिसताच त्याचा लाईव्ह फोटो किंवा व्हिडीओ काढून तो निवडणूक आयोगाला पाठवता येणार आहे. त्यासाठी आयोगाने सीव्हिजिल हा मोबाईल ऍप बनवला आहे. त्यामुळे तक्रारीसाठी निवडणूक अधिकाऱयांकडे जाण्याची गरज नागरिकांना भासणार नाही. गेल्या शनिवारपासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ऍप विकसित केले आहे.
मतदानाच्या दिवशी सुट्टी
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीसाठी यंदा पाच टप्प्यात मतदार होणार आहे. निवडणूकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदाना दिवशी एक दिवसाची सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. लोकसभेच्या 48 मतदारसंघात विविध टप्प्यात म्हणजेच 19,26 एप्रिल,7, 13 व 20 मे या पाच दिवशी मतदान होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारसंघातील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूकीच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचारी निवडणूक मतदान क्षेत्राबाहेर असले तरीही त्यांना भरपगारी सुट्टी मिळणार आहे.
मौल्यवान वस्तूंच्या देवाणघेवाणींवर लक्ष
आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पैशांचा गैरवापर रोखता यावा यासाठी मुंबई प्राप्तिकर विभागाने पूर्णवेळ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मुंबईतील मतदान होईपर्यंत म्हणजे 20 मे 2024 पर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार आहे. नागरिक या कक्षाला पैशांचे अथवा मौल्यवान वस्तूंच्या व्यवहाराबद्दल माहिती देऊ शकतात. माहिती देण्यासाठीचे टोल फ्री क्रमांक ः 1800-221-510 तर व्हॉट्स ऍप/भ्रमण ध्वनी क्रमांक ः 8976176276/ 8976176776 आहे. माहिती देण्यासाठी ईमेल आय डी ः mumbai.addldit.inv7 @incometax.gov.in येथे तक्रार करता येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List