IPL 2024 – चेन्नई आणि मुंबई प्लेऑफ खेळणार नाही
ही हेडिंग वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे भाकीत वर्तवलेय द ग्रेट वीरेंद्र सेहवागने. आयपीएलच्या उद्घाटनाच्याच दिवशी सेहवागने प्ले ऑफ गाठणाऱ्या आपल्या चार संघांची नावे जाहीर करताना त्यात दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांची निवड करून सर्वांनाच धक्का दिला. याचाच अर्थ वीरूच्या टॉप फोरमध्ये धोनीच्या चेन्नईलाही स्थान नाही आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सलाही नाही. तसेच गेल्या दोन्ही आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळलेल्या गुजरात टायटन्सलाही तो प्ले ऑफमध्ये खेळताना पाहत नाहीय.
वीरुचा अंदाज किती खरा ठरतो ते येणारा वेळ सांगलेच; पण ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने मात्र मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली पॅपिटल्स हे संघ प्ले ऑफमध्ये खेळतील असे सांगितले आहे. पार्थिव पटेलनेही आपले चार संघ निवडले असून यात मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा समावेश केला आहे.
IPL 2024 – चेन्नईचा विजयी धमाका सुरू, आरसीबीचा 6 विकेट राखून केला पराभव
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List