भाजपला टेन्शन; महादेव जानकर यांनी घेतली संजीवराजेंची भेट
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल त्यांची सुमारे अर्धा तास चर्चाही केली. मात्र, ही भेट राजकीय नाही तर वैयक्तिक असल्याचे जानकर यांनी माध्यमांना सांगितले.
फलटणमध्ये महादेव जानकर यांनी नुकताच कार्यकर्ता मेळावा घेऊन स्वतःची उमेदवारी माढा व परभणी लोकसभा मतदारसंघातून जाहीर केली होती. त्या आधी त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली होती; परंतु या बैठकीतून ते तडकाफडकी निघून गेल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर जानकर यांनी आज येथे संजीवराजे व रघुनाथराजे यांची भेट घेतली. बाहेर पडल्यानंतर जानकर माध्यमांशी बोलले. ते म्हणाले, त्यांचा आणि माझा पक्ष वेगवेगळा आहे; पण मी धाकटा भाऊ म्हणून त्यांचा आशीर्वाद घ्यायला घरी आलो होतो. आजची माझी भेट ही वैयक्तिक व आशीर्वाद मागण्यासाठी होती, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List