दक्षिण-मध्य मुंबईत भगवा फडकवणारच! वडाळय़ातील मेळाव्यात शिवसैनिकांचा निर्धार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र. 10 वडाळा विधानसभेचा निर्धार मेळावा नुकताच पार पडला. शिवसेनेचा भगवा दक्षिण मध्य मुंबईत फडकवणारच, असा निश्चय या वेळी शिवसैनिकांनी केला. शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव यांनी या वेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
विधानसभा संघटक राकेश देशमुख, सुनिता आयरे, विधानसभा प्रमुख हेमंत डोके, विधानसभा निरीक्षक हरदीप सिंग लाली, विधानसभा समन्वयक दत्ता घाटकर, मालन कदम, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, उपविभागप्रमुख रवींद्र घोले, विलास, राणे रचना अग्रवाल, माधुरी मांजरेकर, उपविधानसभा समन्वयक प्रशांत घाडीगावकर, धनश्री पवार, गीता दळवी, संदीप चिवटे, नितीन पेडणेकर, रवी गुप्ता, वंदना आहिरे, वंदना मोरे, विशाखा जाधव, सविता मांजरे आदी या वेळी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List