वंचितला हवे गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर; निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा प्रस्ताव सादर

वंचितला हवे गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर; निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा प्रस्ताव सादर

महाविकास आघाडीचे जागा वाटप आणि उमेदवार लवकरच जाहीर होणार असतानाच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यावेळी तीन निवडणूक चिन्हांचा प्रस्ताव सादर केला गेला. त्यात गॅस सिलिंडर, शिट्टी आणि रोड रोलर या चिन्हांचा समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडी हा नोंदणीकृत पक्ष असला तरी अद्याप त्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना इतर मोठय़ा पक्षांप्रमाणे राखीव निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या राजकीय पक्षांनाच चिन्ह आरक्षित करून ते वापरण्याची संधी मिळते. मान्यता न मिळालेल्या पक्षांना मुक्त चिन्हांच्या यादीमधून चिन्ह निवडावे लागते.

गॅस सिलिंडर, शिट्टी आणि रोड रोलर या चिन्हांच्या प्रस्तावाबरोबरच राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये एकच चिन्ह वापरण्याची मुभा मिळावी, अशी मागणीही वंचितकडून करण्यात आल्याचे समजते. या प्रस्तावावर विचार करून दोन दिवसांत निर्णय कळवला जाईल, असे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;