सीबीएसईने देशातील 20 शाळांची मान्यता काढली; ठाणे, पुण्यातील एका शाळेचा समावेश
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये डमी विद्यार्थी दाखवणे, वाटेल तसा आर्थिक कारभार करणे, कोणत्याही नोंदी न ठेवणाऱ्या देशातील 20 शाळांची तपासणी करून सीबीएसईने थेट त्यांची मान्यताच काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मान्यता काढून घेण्यात आलेल्या शाळांमध्ये राज्यातील दोन शाळांचा समोवश आहे. त्यात ठाण्यातील राहुल इंटरनॅशनल स्कूल आणि पुण्यातील पायोनिर पब्लिक स्कूल या दोन शाळांचा समावेश आहे. मान्यता काढून घेतलेल्या शाळांमध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याची बाब सीबीएसईला एका तपासणीत आढळून आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
देशात मोठय़ा प्रमाणात सीबीएसईच्या शाळांची संख्या वाढत असून अनेक शाळा एकदा संलग्नता आणि मान्यता घेतल्यानंतर मंडळाकडे कोणताही संबंध ठेवत नसल्याने मंडळाने काही शाळांची तपासणी केली होती. त्यात या शाळा मंडळाने दिलेल्या निकषांचे, परीक्षा आणि त्यासाठीच्या नियमांचे पालन करतात की नाही हे तपासले होते. त्यात मंडळाला या शाळांमध्ये परीक्षेच्या काळात थेट डमी विद्यार्थी बसवून परीक्षा देत असल्याची बाब निदर्शनाला आली होती. तसेच अपात्र ठरविण्यात आलेले विद्यार्थीही यात होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List