दहावी, बारावी परीक्षांचा निकाल वेळेत कसा लागेल? परीक्षकांवर उत्तरपत्रिका तपासणीबरोबरच अन्य कामांचा बोजा

दहावी, बारावी परीक्षांचा निकाल वेळेत कसा लागेल? परीक्षकांवर उत्तरपत्रिका तपासणीबरोबरच अन्य कामांचा बोजा

दहावी, बारावीच्या परीक्षेचे कामकाज करणाऱ्या शिक्षकांवर अन्य कामांचा बोजाही असल्याने या परीक्षांचा निकाल वेळेत लागेल का…. असा सवाल उपस्थित होत आहे. बोर्डाने दिलेल्या वेळेनुसार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करण्याकडे सध्या परीक्षक आणि नियामक गुंतलेले आहेत. मात्र त्यांना पेपरतपासणीबरोबरच बीएलओची कामे, मदरशांचे सर्वेक्षण, पेंद्र संचालनाची कामे, शालेय वार्षिक परीक्षांचे सुपरव्हिजनही करायचे आहे. त्यातच बोर्डाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे शिक्षक हवालदिल झाले आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी केले असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकालाचे काम 45 दिवसांच्या आता पूर्ण करणे आवश्यक असल्याने परीक्षक व नियामकांना इतर कोणतेही काम देऊ नये, अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात असे घडत नसल्याचा काही शिक्षकांचा आरोप आहेत. पेपर तपासणीच्या काळातच अनेक इतर अशैक्षणिक कामांचा बोजा डोक्यावर असून त्यातून कोणतीही सूट मिळत नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

सरकारी अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनीच प्राथमिकता ठरवून शिक्षकांना केवळ शैक्षणिक कामेच करू द्यावीत.

– जालिंदर सरोदे, कार्याध्यक्ष, राज्य शिक्षक सेना

बोर्डाच्या पेपरतपासणीचे काम महत्त्वाचे आहेच त्याचबरोबर शाळेच्या दैनंदिन कामही तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षकांनरा  100 टक्के सूट देणे मुख्याध्यापकांना परवडणारे नाही. त्यामुळे बोर्ड, मुख्याध्यापक आणि शिक्षक या तिघांनीही समन्वय साधत सर्वच कामे मार्गी कशी लागतील हे पाहणे महत्त्वाचे आहे.

– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;