… तर मालमत्ता जप्तीची कारवाई करू! पालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांना इशारा
निर्धारित कालावधीमध्ये करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठय़ा थकबाकीधारकांनी नोटीस बजावल्यानंतरही करभरणा केला नाही तर त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करू, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. गैरसोय टाळण्यासाठी साप्ताहिक सुट्टी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व विभागांमध्ये कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, काही मोठय़ा थकबाकीधारकांकडून अद्याप करभरणा करण्यात येत नसल्याने आणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे खात्याच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या थकबाकीदारांनी वेळेत कर भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List