स्विस ओपन बॅडमिंटन  – सिंधू, सेन पराभूत; श्रीकांत, राजावतची आगेकूच

स्विस ओपन बॅडमिंटन  – सिंधू, सेन पराभूत; श्रीकांत, राजावतची आगेकूच

दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू व झुंजार खेळाडू लक्ष्य सेन या हिंदुस्थानी खेळाडूंचे स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. मात्र किदाम्बी श्रीकांत व प्रियांशू राजावत यांनी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.

पी.व्ही. सिंधूला उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या टोमोका मियाजाकी हिने 16-21, 21-19, 21-16 असे हरवले. ही चुरशीची लढत एक तास 19 मिनिटांपर्यंत रंगली. सिंधूने पहिला सेट जिंकून झकास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पुढील दोन सेट गमावल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीत लक्ष्य  सेनला चिनी तैपेईच्या चिया हाओ ली याने 21-17, 21-15 असे पराभूत केले.

पुरुष एकेरीत 27व्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने स्पर्धेतील अव्वल मानांकित मलेशियाच्या ली जी जिया याचा 21-16, 21-15 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. दुसरीकडे प्रियांशू राजावतने चीनच्या लेई लांक्सी याचे आव्हान 21-14, 21-13 असे सहज मोडून काढत आगेकूच केली. प्रियांशने केवळ 38 मिनिटांत ही लढत संपवली.

महिला दुहेरीत त्रिशा जॉली व गायत्री गोपीचंद या हिंदुस्थानी जोडीने आपल्याच देशाच्या प्रिया-श्रुती मिश्रा या जोडीचा 21-10, 21-12 असा सहज पराभव करीत आगेकूच केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;