शरथ कमल हिंदुस्थानी पथकाचा ध्वजवाहक, मेरी कोम ऑलिम्पिक मोहिमेची प्रमुख

शरथ कमल हिंदुस्थानी पथकाचा ध्वजवाहक, मेरी कोम ऑलिम्पिक मोहिमेची प्रमुख

या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी फ्रान्स जय्यत तयारी करत आहे. खेळाडूंचीही या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचा अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमल याला हिंदुस्थानी पथकाचा ध्वजवाहक होण्याचा मान देण्यात आला आहे. याचबरोबर ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हिला हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक मोहिमेचे प्रमुख बनविण्यात आले आहे.

हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) ही माहिती दिली. दरम्यान, ऑलिम्पियन शिवा केशवनला हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक मोहिमेचे उपप्रमुख पद देण्यात आले आहे. ‘‘खेळासाठी मेरी कोमने दिलेल्या अतुलनीय समर्पणामुळेच तिची निवड ऑलिम्पिकमध्ये आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात आली आहे. केशवननेही ल्यूग क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आणि ज्ञान संघव्यवस्थापनाला मदतगार ठरेल,’’ असे ‘आयओए’ने म्हटले आहे.

याचबरोबर ऑलिम्पिक पदकविजेता गगन नारंगने शूटिंग रेंजमध्ये हिंदुस्थानचे व्यवस्थापन पाहिले. कारण शूटिंग रेंज स्पर्धेच्या मुख्य ठिकाणापासून बरीच लांब आहे. हिंदुस्थानला नेमबाजीत 19 ऑलिम्पिक कोटा मिळाला आहे. त्यामुळे हे हिंदुस्थानचे नेमबाजीतील सर्वात मोठे पथक असणार आहे.

ऑलिम्पिक मोहिमेसाठी महत्त्वाच्या पदावर नेमणूक करताना खेळाडूंचा अनुभव, काwशल्य आणि नेतृत्वगुण यांचा विचार करण्यात आला आहे, अशी माहितीही हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनने पत्रात दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;