राज्य कबड्डी संघटनेत अदृश्य शक्तींचा हात; ना वार्षिक सभेचा पत्ता, ना निवडणुकीबाबत घोषणा

राज्य कबड्डी संघटनेत अदृश्य शक्तींचा हात; ना वार्षिक सभेचा पत्ता, ना निवडणुकीबाबत घोषणा

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा कार्यकाळ संपून पाच महिने उलटून गेलेत, पण अद्याप सर्वसाधारण वार्षिक सभेचा पत्ता नाही, ना निवडणुकीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. संघटनेत अतिसक्रिय असलेले पदाधिकारी वशिलेबाजीमुळे बाहेर फेकले गेल्याचेही दिसतेय, तर त्यांच्या अनुपस्थितीत राज्य कबड्डी संघटना काही अदृश्य शक्ती चालवत असल्याचा आरोप संघटनेचे इमानदार कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे राज्य कबड्डी संघटना आणखी किती महिने वालीशिवाय चालणार याचे उत्तर कुणाकडेही सापडत नाहीय.

सध्या नगर जिल्ह्यात जोशात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे यजमान जरी राज्य संघटनेला मिळाले असले तरी ही स्पर्धा नगर जिल्हा हौशी संघटनेच्या मेहनतीवर आयोजित केली गेली आहे. असे असताना या स्पर्धेला राज्याचा तगडा संघ निवडताना राज्याच्या काही वशिलेबाजांचे वाली असलेल्या पदाधिकाऱ्यांनी गुणवान खेळाडूंवर अन्याय करण्याचा पराक्रम केला होता. असेच प्रकार सर्व संघनिवडीत केल्या गेल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. वशिलेबाजांनी केलेल्या निवडीमुळे संघांची कामगिरी कशी झाली ते आता कुणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. पण याचदरम्यान राज्य संघटनेत सुरू असलेला सावळागोंधळ संपविण्यासाठी निवडणूक होणे गरजेचे असतानाही निवडणुकीच्या घोषणेसाठी आवश्यक असलेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेला तारीख पे तारीख पडतेय. वार्षिक सभेची तारीख जाहीर केल्यानंतर ती कोणतेही कारण न देता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्य संघटनेची निवडणूक पेंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाने तयार केलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार व्हायला हवी, पण संघटनेचे काही पदाधिकारी केवळ पळवाटा शोधण्यातच मग्न आहेत. राज्य संघटनेलाच आदर्श आचारसंहितेचे काही पडलेले नसल्यामुळे जिल्हा संघटनाही द्विधा मनस्थितीत आहेत. राज्य संघटनेनेच आदर्श आचारसंहितेचे पालन करून आपल्या घटनेतच बदल केलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा संघटनांनीही राज्य संघटनेच्याच पावलांवर पाऊल ठेवत निवडणुका घेतल्या आहेत. कबड्डीच्या भल्यासाठी राज्य संघटनेची निवडणूक तत्काळ होणे गरजेचे आहे, पण कुणालाही याबाबत गांभीर्य नाही. कारण कबड्डीला कुणी आता वालीच नाही, जो खंबीरपणे निर्णय घेईल. इथे स्क्रीप्ट एक लिहितोय आणि त्यावर दुसऱ्याची स्वाक्षरी केली जातेय. सध्या निवडणुकांचा काळ सुरू असल्यामुळे या हौशी संघटनेला पुढील अडीच-तीन महिने वाली मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे अदृश्य शक्ती आणखी किती दिवस कबड्डीला आपल्या मुठीत ठेवतील हे सांगता येणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;