वाराणसीत पोहोचला ‘देवमाणूस’; किरण गायकवाडचा हा अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक
झी मराठी वाहिनीवर ‘देवमाणूस- मधला अध्याय’ या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या सिझनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार, यात कोणते कलाकार असणार, याची सगळीकडे चर्चा सुरू झाली. यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड दिसणार आहे.
नुकतंच या मालिकेचं शूटिंग वाराणसीमध्ये पार पडलं होतं. त्याविषयी किरण म्हणाला, "वाराणसीतील शूटिंगचा अनुभव खूप कमाल होता. खरं तर ही गोष्ट माझ्या बकेटलिस्टमध्ये होती. कधीतरी मी वाराणसीला जावं, अशी माझी खूप इच्छा होती."
तिकडच्या भाषेचा एक लहेजा आहे. गंगा किनार आणि घाटांचं सौंदर्य अनुभवायचं होत. जसं मला कळलं की वाराणसीला शूटिंग आहे, तेव्हा माझा उत्साह अधिक वाढला. मागच्या सिझनमध्ये आम्ही राजस्थानमध्ये शूट केलं होतं. तेव्हा मला तिकडची भाषा शिकायला मिळाली आणि राजस्थानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आला," असं तो पुढे म्हणाला.
वाराणसीतील शूटिंगबद्दल त्याने पुढे सांगितलं, "आम्ही तीन-चार दिवसांसाठी वाराणसीला शूटिंग केलं होतं. त्यामुळे टाईमलाइन खूप कट टू कट होती. आम्ही ज्या ठिकाणंवर शूटिंग करत होतो, तिकडची माणसं मला ओळखत होती. कारण या आधीचे सिझन हिंदीमध्येही डब झाले आहे. त्यामुळे देवमाणूसचा प्रेक्षक तिथेही होता."
वाराणसीच्या गल्लीमध्ये मी चढावर आठ-नऊ किलोमीटर सलग सायकल चालवली आहे. खूप भयंकर हाल झाले होते माझे. सायकल जोरात चालवायची होती आणि त्यात सायकलची चेनही निघत होती. दोन-तीन वेळा मी पडता पडता वाचलो. तिकडे गर्दीही होती."
हे सर्व एके ठिकाणी होत असताना भान ठेवणं की आपण एक पात्र साकारत आहोत ती एक वेगळी कसरत होती. मी पहिल्यांदाच वाराणसीला गेलो होतो. माझ्यासाठी सर्वच नवीन होतं. तिकडे मणिकर्णिका घाट आहे, राजा हरिश्चंद्र घाट आहे. सर्वांना एकत्र गंगा आरतीमध्ये तल्लीन होताना मला बघायच होतं."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.







Comment List