पाकिस्तानच्या विनंतीनंतरच शस्त्रसंधीचा द्विपक्षीय निर्णय, लष्कराकडून बुकलेट जारी

पाकिस्तानच्या विनंतीनंतरच शस्त्रसंधीचा द्विपक्षीय निर्णय, लष्कराकडून बुकलेट जारी

हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा दिल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी विनंती केली. त्यानंतरच दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार झाला. यात अमेरिकेची कुठल्याही प्रकारची मध्यस्थी नव्हती, अशी माहिती हिंदुस्थानी लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या बुकलेटमध्ये देण्यात आली आहे. वॉर रूममध्ये तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. तेथून ते हिंदुस्थानी लष्कराकडून पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याच्या ऑपरेशनवर बारीक नजर ठेवून होते. या कारवाईचे मॉनिटरिंग करत होते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बुकलेटमध्ये सांगण्यात आले आहे की, कशा पद्धतीने वॉर रूममधून संपूर्ण ऑपरेशन सिंदूरवर नजर ठेवण्यात येत होती. आर्मी चीफ जनरल उकेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख चीफ अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल एपी सिंह तिथे उपस्थित होते. दुसरीकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदीय समन्वय समितीची बैठक घेतली. पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतरच याबद्दलची माहिती पाकिस्तानच्या डीजीएमओंना देण्यात आली, असे परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

राजस्थानवर डागले 413 ड्रोन्स

पाकिस्तानने राजस्थानातील नागरी वस्त्यांवर तसेच हिंदुस्थानच्या लष्करी तळांवर तब्बल 413 ड्रोन्स डागल्याची माहिती हिंदुस्थानी लष्कराने दिली आहे. पाकिस्तानने बाडमेर, जैसलमेर, बिकानेर, श्रीगंगानगर जिह्यात एकूण 413 हल्ले केले. हे सर्व हल्ले परतवून लावण्यात आले. हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व ड्रोन्स पाडल्याची माहिती लष्कराने दिली आहे. दरम्यान, राजस्थानच्या फलोदी हवाई तळासह अनेक संवेदनशील ठिकाणांनाही पाकिस्तानने लक्ष्य बनवले; परंतु हिंदुस्थानी लष्कराने अचूक टायमिंग साधत सर्व हल्ले निष्क्रिय केल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाचे आयजी एमएल गर्ग यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;