कुश मैनीने खूश केलं, फॉर्म्युला 2 जिंकणारा पहिलाच हिंदुस्थानी

कुश मैनीने खूश केलं, फॉर्म्युला 2 जिंकणारा पहिलाच हिंदुस्थानी

हिंदुस्थानी रेसर कुश मैनीने जगातील सर्वात प्रतिष्ठत अन् कठीण समजल्या जाणाऱया मोनॅको ग्रां.प्रि.मध्ये फॉर्म्युला 2 ची स्प्रिंट रेस जिंकून इतिहास घडविला. ही रेस जिंकणारा तो पहिला हिंदुस्थानी ड्रायव्हर ठरलाय.

डॅम्स लुकास ऑइल टीमसाठी रेस करताना कुशने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी कायम राखली आणि शानदार शैलीत विजय मिळवला. हा केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानसाठी अभिमानाचा क्षण ठरला. कुशने कारकीर्दीत पहिली एफ-2 स्प्रिंट रेस जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच त्यांचा हा पहिलाच पोडियम फिनिशही ठरला. मोनॅकोसारख्या अरुंद आणि आव्हानात्मक रस्त्यांवर 30 लॅप्सपर्यंत त्याने जबरदस्त नियंत्रण राखत या शर्यतीत बाजी मारली.

एफ-2च्या नियमानुसार कुशने फीचर रेससाठी पी-10 वर क्वालिफाय केलं होतं. त्यामुळे त्यांना रिव्हर्स ग्रिडच्या नियमांमुळे शनिवारी झालेल्या स्प्रिंट रेसमध्ये पोल पोजिशन मिळाली. कुशने याचा उत्तम फायदा घेत आत्मविश्वासाने ही रेस जिंकली.

स्वप्न सत्यात उतरलं – कुश मैनी

‘पी-1 मिळवणं आणि मोनॅकोमध्ये विजेतेपद पटकाविणारा पहिला हिंदुस्थानी ड्रायव्हर बनणं, ही माझ्यासाठी भुषणावह बाब होय. स्वप्न अखेर सत्यात उतरलं. मी माझ्या डॅम्स टीमचं आणि सर्व समर्थकांचे मनापासून आभार मानतो. ही फक्त सुरुवात आहे. मला अशा अनेक रेस जिंकायच्या आहेत.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोरेगावातील कचरा डेपोप्रकरणी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा कोरेगावातील कचरा डेपोप्रकरणी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
कोरेगाव नगरपंचायतीने बेकायदेशीररीत्या उभारलेल्या कचरा डेपोमध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असून, शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत...
शिधापत्रिकांची ‘ई-केवायसी’ करण्यास अनास्था; साताऱ्यात अजूनही साडेतीन लाख जणांनी केले नाही प्रमाणिकरण
अहिल्यानगरमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार; चार सदस्यीय प्रभाग रचना होणार
हलकर्णी परिसरातील दोन खडी क्रशर बंद होणार; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश
धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या; पती, सासू-सासऱ्याला अटक, पोलीस कोठडी
‘अलमट्टी’च्या उंचीला सरकारचा विरोधच! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
शनिभक्तांची फसवणूक; बनावट ऍपची चौकशी होणार; शनेश्वर देवस्थानची सायबर पोलिसांकडे तक्रार