पहिल्याच पावसात मुंबईची त्रेधातिरपीट! मोदी, फडणवीस, मिंधे यांच्या चमकोगिरीची पोलखोल; शेकडो कोटी रुपये पाण्यात! भुयारी मेट्रो बुडाली!!
तळकोकणातून 24 तासांच्या आत मान्सूनने मुंबईत धडक दिली आणि पहिल्याच पावसात मुंबईची त्रेधातिरपीट उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चमकोगिरीची पोलखोल झाली आणि दोनच आठवडय़ांपूर्वी घिसाडघाईत अर्धवट अवस्थेत सुरू केलेली भुयारी मेट्रो बुडाली. वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानक जलमय होऊन शेकडो कोटी पाण्यात गेले. केवळ मेट्रोच नाही, तर अख्ख्या मुंबईची वाताहत पाहायला मिळाली. महापालिका यंत्रणा वाहून गेली आणि सरकारचे सगळे दावेही फोल ठरले. अपूर्ण नालेसफाई, खोदून ठेवलेले रस्ते यामुळे मुंबापुरीची तुंबापुरी झाली. लोकल कोलमडली आणि रस्ते ब्लॉक झाल्याने मुंबईकरांचा चहुबाजूंनी कोडमारा झाला.
पहिल्याच पावसात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राची दाणादाण उडाली. सर्वत्र भयंकर स्थिती असताना जिथून राज्य हाकले जाते त्या मंत्रालयाच्या दारातही गुडघाभर पाणी भरले. त्याची धास्ती घेऊन दुपारनंतर कर्मचारी, अधिकाऱयांनी परतीची वाट धरली. दुपारी चार वाजताच मंत्रालयात शुकशुकाट पसरला होता. सरकारी यंत्रणा कुठेच दिसत नव्हती. महाराष्ट्र वाऱयावर असताना मंत्री मात्र आपत्कालीन फोटोसेशन करण्यात बिझी दिसले. त्यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हिंदमाता, किंग्ज सर्कल पाण्याखाली
गेल्या काही वर्षांत भूमिगत टाक्यांच्या प्रयोगामुळे पूरमुक्त झालेला हिंदमाता परिसरही या वर्षी पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचा प्रकार समोर आला. शिवाय किंग्ज सर्कल, दादर टीटी परिसरही पाण्याखाली गेला. मस्जिद येथे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तर बेस्टच्या अनेक मार्गांवर पाणी साचल्याने गाडय़ांचा मार्ग बदलावा लागला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पाणी शिरल्याने प्रवाशांचे हाल झाले.
बसेस इतर मार्गाने वळवल्या
गांधी मार्पेट येथे पाणी भरल्यामुळे दोन्ही दिशेतील बसगाडय़ा भाऊ दाजी मार्गाने परावर्तित करण्यात आल्या. सायन रोड नंबर 24 येथे पाणी भरल्यामुळे मार्ग क्रमांक 341 व 312 या अप दिशेतील बसगाडय़ा सायन मेन रोडचा सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन यू टर्न घेऊन व पूर्ववत मार्गस्थ करण्यात आल्या. वडाळा उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक 117 व 174 या बस गाडय़ा सकाळी 9 वाजल्यापासून वडाळा चर्चमार्गे परावर्तित करण्यात आल्या. हिंदमाता येथे पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक 40, 212, 368 या दोन्ही दिशेमध्ये शारदा सिनेमाकडून 9.30 वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहेत. केम्स कॉर्नर ते मुकेश चौकच्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे अप दिशेतील बस मार्ग क्रमांक 104, 121, 122, 132, 135 या बसेस पेडर रोड, कॅडबरी जंक्शन, भुलाबाई देसाई मार्गाने जे. मेहताकडे वळवण्यात आल्या. केम्स कॉर्नर ते मुकेश चौकच्या दरम्यान रस्ता खचल्याने येथील वाहतूकही इतर मार्गाने वळवण्यात आली.
गरज असेल तरच घराबाहेर पडा!
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले. मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100/112/103 या क्रमांकांवर संपर्क साधा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले.
मुंबईत 107 वर्षांतील रेकॉर्डब्रेक पाऊस
मान्सून प्रचंड वेगाने सक्रिय झाला आणि एका दिवसात तळकोकणातून मुंबईत आला. शहरात 107 वर्षांतील रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. मध्यरात्रीपासून मुसळधार हजेरी लावलेल्या मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी 107 वर्षांपूर्वी म्हणजे 1918 मध्ये नोंदवलेल्या पावसाचा विक्रम मोडला. 1918 मध्ये मे महिन्यात 279.4 मिमी पाऊस पडला होता. तो विक्रम मागे टाकून सोमवारी कुलाब्यात मे महिन्यातील सर्वाधिक 295 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत सकाळी 8.30 वाजेपर्यंत 24 तासांत 135.4 मिमी पाऊस झाला. तर काल रात्री 11 वाजल्यापासून आज सकाळी 11 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 252 मिमी पाऊस झाला, असे मुंबई हवामान खात्याच्या शुभांगी भुते यांनी सांगितले.
आपत्कालीन फोटोसेशनात मंत्री बिझी
मुंबई आणि राज्यावर पावसाचे संकट कोसळलेले असताना मंत्री मात्र आपत्कालीन फोटोसेशनात बिझी होते. महाजन आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहचले. तिथे माहिती घेत असताना त्यांच्याकडे कॅमेरे आधीच सेट करून ठेवण्यात आले होते. कॅमेऱ्याकडे पाहतच महाजन अधिकाऱयांना सूचना देत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबई पालिकेत जाऊन अशीच चमकोगिरी केली.
शिंदे म्हणतात, पाकसाचे स्कागत करा, तक्रारी काय करता!
मुंबई पाण्यात गेली त्याबाबत किचारले असता, पाऊस आला आहे त्याचं स्कागत करा. तक्रारी काय करता, असा उलट सकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना केला. जिकडे पाणी भरेल तेथील अधिकाऱयांकर कारकाई करणार, जिकडे पाणी भरणार नाही तिथल्या अधिकाऱयांचा सत्कार करणार, असेही ते म्हणाले.
पुढील 48 तास ‘धो धो’; मुंबई, कोकणात रेड अलर्ट
मुंबई शहरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिह्यांत पुढील 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱयासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने हा अंदाज वर्तवत मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्याचबरोबर कर्नाटक, केरळ आणि तामीळनाडूच्या काही भागांतही पाऊस हाहाकार उडवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हे भाग गेले पाण्याखाली
कुलाबा, हिंदमाता, मिलन सबवे, नरीमन पॉइंट, सायन सर्कल, शेल कॉलनी, वरळी, दादर टीटी, सीएसटी परिसर, परळ, लालबाग, मस्जिद बंदर, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, वांद्रे, धारावी, माटुंगा, भांडुप, मुलुंड, जोगेश्वरी, वडाळा, फोर्ट, केईएम रुग्णालय परिसर, जे जे परिसर, भायखळा, खार, मुलुंड, विद्याविहार आदी भागात पावसामुळे जागोजागी पाणी साचले.
कर्वेनगरमध्ये दुचाकीस्वाराच्या अंगावर झाड कोसळले, एकजण ठार
पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात दुर्दैवी घटना घडली असून अलंकार पोलीस चौकीजवळ रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे झाड परिसरातून जाणारा दुचाकीस्वार राहुल जोशी (49) या तरुणाच्या अंगावर पडले. त्यामुळे गंभीरपणे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
पडझडीच्या घटना, 9 ठिकाणी घर कोसळले
शहरात 7, पूर्व उपनगरांत 1, पश्चिम उपनगरांत 1 अशा एकूण 9 ठिकाणी घराचा, इमारतीचा भाग पडल्याच्या घटना घडल्या.
माहीम येथे इमारतीचा भाग कोसळला
माहीम येथील पँडल रोडवरील जहांगीर बाग चाळ, सनसेट हॉटेल येथील हाजी कासम इमारत या म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला. या इमारतीत अडकलेल्या 2 स्थानिक रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
45 ठिकाणी झाडे, फांद्या कोसळल्या
शहरात 34, पूर्व उपनगरात व पश्चिम उपनगरांत 8 अशा एकूण 45 ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या.
सेंट झेवियर्स येथे एक जखमी
सेंट झेवियर्स महाविद्यालय येथे झाडाची फांदी पडून साईराज पवार (24) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
पावसाची नोंद
- कुलाबा – 144.3 मिमी
- सांताक्रुझ – 74.3 मिमी
मेट्रो स्थानकात चिखल
भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यामुळे काही वेळ मेट्रोचे दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे प्रवासी मेट्रोतच अडकून पडले. काही वेळानंतर मेट्रोचे दरवाजे उघडले आणि प्रवासी बाहेर पडले.
मेट्रो स्थानकात धबधब्यासारखे पाणी पडत होते. स्वयंचलित जिने बंद करण्यात आले. बाहेरील कचरा आणि घाण मोठय़ा प्रमाणात स्थानकात शिरली आणि स्थानकात चिखलाचे साम्राज्य पसरले.
स्थानकाच्या छतातूनही धोधो पाणी कोसळत होते. त्यामुळे सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉइंट, सरकते जिने यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मेट्रो स्थानकात पाणी साचल्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून नागरिकांकडून मेट्रो प्रशासन आणि सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List