महाराष्ट्रात केंद्रीय कार्यालयांत मराठी बंधनकारक, सरकारचे आस्थापनांना पत्र

महाराष्ट्रात केंद्रीय कार्यालयांत मराठी बंधनकारक, सरकारचे आस्थापनांना पत्र

केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याचा आक्षेप लोकलेखा कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या मराठी भाषा विभागाला खडबडून जाग आली असून या विभागाने आयकर विभाग, आरबीआय, रेल्वे, टपाल विभाग अशा केंद्रीय आस्थापनांना पत्र पाठवून मराठी भाषेचा वापर करण्याचे आदेश आज जारी केले आहेत.

त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या अशा कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर सक्तीचा आहे. पण राज्यातील बँका, दूरध्वनी, टपाल, विमा, रेल्वे, मेट्रो, मोनो रेल, विमान प्रवास व विमान कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या, केंद्र शासनाच्या अन्य कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या तक्रारी सरकारकडे विविध माध्यमातून आल्या आहेत. लोकप्रतिनिधींनीही तक्रारी केल्या आहेत. मुख्य म्हणजे याबाबत लेखा आक्षेपही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या वापराबाबत राज्याच्या मराठी भाषा विभागाने पत्रक जारी केले आहे.

ऑफिडेव्हिट घेणार

राज्यातील सर्व केंद्रीय कार्यालये, बँका, विमा पंपन्या व अन्य कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात येतो अथवा नाही याची जिल्हाधिकाऱयांनी पडताळणी करावी. संबधित कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात येतो अथवा नाही याबाबतचे स्वयंघोषणापत्र संबंधित कार्यालयांनी जिल्हाधिकाऱयांना सादर करावे असे आदेशात नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयांमध्ये पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱया बैठकांना केंद्रीय आस्थापनांमधील प्रतिनिधींना बोलावून मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;