वाल्मीक कराडची चाकरी करणार्‍या कारागृह अधीक्षकांची उचलबांगडी

वाल्मीक कराडची चाकरी करणार्‍या कारागृह अधीक्षकांची उचलबांगडी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडची चाकरी करणारे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. वादग्रस्त पोलीस अधीकारी रणजीत कासले यांनीही कराडचा कारागृहात व्हीआयपी पाहुणचार करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अमानुष हत्या करण्यात आली. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्चकंठश्च वाल्मीक कराडसह आठ जणांना ‘मकोका’ लावण्यात आला आहे. या सर्वांचा मुक्काम सध्या बीड कारागृहात आहे. बीड कारागृहात वाल्मीक कराडला व्हीआयपी वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यानंतर देशमुख कुटुंबानेही कराडला देण्यात येणार्‍या सुविधांवर आक्षेप घेतला होता. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनीही कराडला कारागृहात मिळणार्‍या वागणुकीचा भंडाफोड केला होता.

बीड कारागृहाचे अधीक्षक बक्सार मुलानी यांची आज तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर रत्नागिरीहून रामराजे चांदणे येणार आहेत. वाल्मीक कराडचा पाहुणचार करणे मुलानी यांना भोवल्याची चर्चा आहे. मुलानी हे गेल्या तीन वर्षांपासून बीड येथे कार्यरत होते. कार्यकाळ संपल्यानेच त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी वाल्मीक कराडशी असलेली जवळीकच त्यांना भोवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;