भाजपला मोठा हादरा! उत्तरप्रदेशात एनडीएला भगदाड; अपना दल, निषाद पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढवणार

भाजपला मोठा हादरा! उत्तरप्रदेशात एनडीएला भगदाड; अपना दल, निषाद पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढवणार

बोटावर मोजण्याएवढे पक्ष शिल्लक राहिलेल्या एनडीएला उत्तर प्रदेशात भगदाड पडले आहे. अपना दल आणि निषाद पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची दोन्ही पक्षांनी भाजपला पुसटशी कल्पनाही दिली नाही.
उत्तरप्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपने अपना दल आणि निषाद पार्टीच्या टेकूवर जिंकल्या. त्याचे फळही या दोन्ही पक्षांना मिळाले. मात्र आता उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच या दोन्ही पक्षांनी भाजपचा हात सोडला आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (एस)ने  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ निषाद पार्टीनेही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतंत्र चूल मांडत असल्याची घोषणा केली.
अपना दल आणि निषाद पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करेल याची भाजपने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी लागोपाठ घोषणा करताच भाजपला मोठा हादरा बसला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आमच्या मित्रपक्षांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचे आम्हाला माध्यमातूनच कळले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएमध्ये अद्याप या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही मौर्य यांनी सांगितले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Meditation Benefits- रात्री झोपण्यापूर्वी मेडिटेशन करण्याचे फायदे, वाचा Meditation Benefits- रात्री झोपण्यापूर्वी मेडिटेशन करण्याचे फायदे, वाचा
मेडिटेशन शरीर आणि मनाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. मेडिटेशन दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी केले जाते. रात्री केलेल्या...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शक्य असेल तेथेच युती! – प्रफुल्ल पटेल
एका ताटात जेवलो हे कधीही विसरणार नाही! सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
पोलीस डायरी – न संपणारे दुष्टचक्र
1960 चा कॅलिफोर्निया अन् आताची भयावह स्थिती; अमेरिकेतील उद्रेक वंशवादाच्या दिशेने
Foot Massage Benefits- आरोग्यासाठी पादाभ्यंग थेरपी आहे वरदान, वाचा सविस्तर
AC तापमानाबाबत उर्जाधोरण लागू होणार; केंद्रीय उर्जामंत्री मनोहर लाल खट्टर यांची घोषणा