…तर बाळासाहेबांनी त्यांना दारात उभं केल नसतं, अंबादास दानवे यांचा अमित शहांना टोला

…तर बाळासाहेबांनी त्यांना दारात उभं केल नसतं, अंबादास दानवे यांचा अमित शहांना टोला

‘ऑपरेशन सिंदूर’ ही नव्या हिंदुस्थानची ओळख आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मोहिमेसाठी मोदींचे कौतुकच केले असते, अशी बढाई गृहमंत्री अमित शहा यांनी आज नांदेड येथे झालेल्या सभेत मारली. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला. ”शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला कधीच दारात उभं केलं नसतं”, असा सणसणीत टोला अंबादास दानवे यांनी लगावला. अंबादास दानवे यांनी ट्विटर करत गृहमंत्र्यांना चांगलेच सुनावले.

”नांदेडला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती. मात्र त्यांनी काय केलं असतं हे आम्ही शिवसैनिक जास्त चांगलं सांगू शकतो. अगोदर, त्यांनी शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला कधीच दारात उभं केलं नसतं, गळाभेट लांबच. धर्म विचारून हिंदूंचे प्राण घेणारे ‘ते हल्लेखोर अतिरेकी’ कुठे आहेत, हा सवाल त्यांनी केला असता. त्यांनी हे ही विचारले असते की, ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सगळा देश सोबत उभा असताना, कोणाच्या दबावाखाली पाकिस्तानशी शस्त्रसंधी घोषित करण्यात आली? असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.

”दुसरीकडे, आज मराठवाड्यावर विशेष प्रेमाचा देखावा करताना त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडचा उल्लेख केला.या योजनेच्या कागदांचा गठ्ठा मंजुरीसाठी आपल्या केंद्र सरकारकडे पाठवल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्याचं पुढे काय झालं, हे मात्र शाह सांगायला विसरले.. हे कोकण आणि कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याला देणार हे भाजप 10 वर्षांपासून सांगते आहे. अजून तरी एकही थेंब मराठवाड्यात आलेला नाही! तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन आपण भाषण सुरू केले खरे मात्र चिकलठाणा विमानतळाला त्यांचे नाव देण्याची फाईल अंतिम मंजुरीची वाट पाहत अजून केंद्राकडे धूळखात पडली आहे, याचीही आठवण अंबादास दानवे यांनी शहांना ट्विटरवरून करून दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;