MI Vs PBKS – सूर्यकुमार यादवने सचिन तेंडूलकरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

MI Vs PBKS – सूर्यकुमार यादवने सचिन तेंडूलकरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखल्या जाणार्या सूर्यकुमार यादवने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्याच चेंडू टोलवण्याची त्याची क्षमता क्रीडा प्रेमींना न्यात आहे. त्यामुळे त्याचे मुंबईतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्याच चाहते आहेत. पंजाबविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यता त्याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवत 39 चेंडूंमध्ये 57 धावा चोपून काढल्या. यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. याचसोबत त्याने सचिन तेंडूलकरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला आहे.

सूर्यकुमार यादवने IPL 2025 मध्ये आतापर्यंत धमाकेदार फलंदाजी करत 14 सामन्यांमध्ये 640 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. याचसोबत त्याने एकाच हंगामात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सचिन तेंडूलकरने 2010 साली 618 धावा करत या विक्रमाची नोंद केली होती. त्यानंतर कोणत्याच खेळाडूला हा विक्रम मोडता आला नाही. परंतु आता सूर्यकुमार यादवने 640 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;