महिषासुराच्या विनाशासाठी आदिशक्तीचं बालरुप; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा भावनिक, अध्यात्मिक टप्पा
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका ‘आई तुळजाभवानी’ सध्या एका निर्णायक आणि अत्यंत गूढ टप्प्यावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी देवीने एका आंब्याच्या कवडीत आपलं अस्तित्व प्रकट करत प्रेक्षकांना अचंबित केलं होतं.
“ही फक्त तुझीच परीक्षा नाही, तर माझ्या भक्तांचीही आहे,” या वाक्यातून आदिशक्तीने एक संकेत दिला होता. त्या संकेतासोबतच सत्य आणि धर्माच्या विजयासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. या कवडीच्या माध्यमातून देवीचं सर्वव्यापी आणि सूक्ष्म स्वरूप प्रकट झालं आहे आणि आता हीच देवी एका नव्या रूपात दर्शन देणार आहे.
हे दर्शन म्हणजे आई तुळजाभवानी बाळरूपात प्रकट होणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचं बाळरूप दर्शन हे एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे. जिथे लढाई फक्त बाह्य असुरांविरुद्ध नव्हे, तर अंतर्मनातल्या आसुरी वृत्तीविरुद्ध सुरू होते.
जनकबाबा आणि गंगाई हे देवीचे निस्सीम भक्त असलेलं जोडपं एका गूढ आवाजाच्या दिशेने जातात आणि समोर दिसतात फुत्कार करणारे अनेक साप. या धक्कादायक दृश्यात, अचानक साप बाजूला होतात आणि एका टोपलीत हसणारं बाळ दिसतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List