ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात चौघे जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात चौघे जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम राष्ट्रीय महामार्गाजवळ सोमवारी हा अपघात घडला. पाच जण राजमुंद्री येथील दिवान चेरुवू भागातून कोव्वुरू येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात हलवताना मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. ट्रकचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;