ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पाकिस्तान भेटीचा नवीन VIDEO आला समोर

ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पाकिस्तान भेटीचा नवीन VIDEO आला समोर

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​हिला सोमवारी हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ज्योतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिला हिसारच्या मध्यवर्ती कारागृह क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात येईल, जे महिलांसाठी आहे.

दरम्यान, ज्योतीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती पाकिस्तानच्या बाजारात फिरत आहे. त्याच्या आजूबाजूला एके-47 बंदुका असलेले पाकिस्तानी सुरक्षारक्षकही दिसत आहेत. हा व्हिडीओ स्कॉटिश युट्यूबर कॅलम मिलने शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये, ज्योती कॅलमला विचारते, ही तुझी पहिलीच पाकिस्तान भेट आहे का? यावर कॅलम म्हणतो की, मी पाचव्यांदा आलो आहे. ज्योती विचारते की, तुला पाकिस्तान देश कसा वाटला? यावर कॅलम पाकिस्तान झिंदाबादचा नारा देताना व्हिडीओत दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजस्थानच्या व्यापाऱ्याची रोकड लांबवणाऱ्या आरोपीला पिंपरीतून अटक, देवनार बकरा मंडीत चोरी राजस्थानच्या व्यापाऱ्याची रोकड लांबवणाऱ्या आरोपीला पिंपरीतून अटक, देवनार बकरा मंडीत चोरी
देवनार कत्तलखान्यात भरलेल्या बकरा मंडीत एकाने चोरी केली. राजस्थानच्या व्यापाऱयाने बकऱया विकून मिळवलेले 11 लाख 70 हजार रुपये चोराने शिताफीने...
कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन
शोभेच्या फुलातून कोकेनची तस्करी
गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं
कतरिना कैफ मालदीवच्या ब्रँड ऍम्बेसेडरपदी
Ratnagiri News – घेरा यशवंतगडाच्या कोसळलेल्या कामाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा, माजी आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम, प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश