Dapoli News : दापोलीत पावसाचा कहर, कोंडीच्या पुलावरुन एक जण गेला वाहून; शोधकार्य सुरू

Dapoli News : दापोलीत पावसाचा कहर, कोंडीच्या पुलावरुन एक जण गेला वाहून; शोधकार्य सुरू

दापोली तालुक्यात मे महिन्यातील मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वणंद येथील राजेंद्र सोनू कोळंबे (वय 49) हे सायकलसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वणंद येथील कांगणेवाडीत राहणारे राजेंद्र हे सकाळी कामावरून घरी परतत होते. माता रमाई स्मारकाजवळील कोंडी नदीच्या कॉजवेवरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना ते वाहून गेले. ग्रामस्थांनी तातडीने तालुका आपत्ती व्यवस्थापनाला कळविल्याने तहसीलदार अर्चना बोंबे (घोलप) आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र, मुसळधार पाऊस आणि नदीकाठची झाडेझुडपे यांमुळे शोधकार्यात अडथळे आले. स्थानिकांनीही आटोकाट प्रयत्न केले, पण सायंकाळी 6 वाजेपर्यंत राजेंद्र यांचा शोध लागला नाही. त्यांची सायकल कॉजवेखालील डोहात सापडली. दरम्यान, दापोलीत गेल्या 24 तासांत 237.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मे महिन्यातील हा अभूतपूर्व पाऊस ठरला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;