इस्त्रायलने गाझातील शाळेवर केला हवाई हल्ला, 30 जणांचा मृत्यू

इस्त्रायलने गाझातील शाळेवर केला हवाई हल्ला, 30 जणांचा मृत्यू

इस्त्रायलने रविवारी मध्यरात्री गाझा पट्टीत अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. यातील एका हल्ल्यात शरणार्थी शिविर म्हणून वापरल्या जाणाऱ्या किंडरगार्टन शाळेवर इस्त्रायलने बॉम्बहल्ला केला, ज्यात 30 जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात शाळेला आग लागल्याने अनेक जण जिवंत जळाले.

मृतांमध्ये रेड क्रॉसचे दोन कार्यकर्ते, एक पत्रकार आणि अनेक मुले यांचा समावेश आहे. ‘अल जझीरा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी गाझामध्ये इस्त्रायली हल्ल्यांमुळे 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यावर स्पेनने जगभरातील देशांना इस्त्रायलवर निर्बंध लादण्याची मागणी केली आहे.

अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्त्रायलने गाझाच्या 77 टक्के भागावर ताबा मिळवला आहे. गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने इस्त्रायलवर नरसंहाराचा आरोप करत संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हार्बर रेल्वे विस्कळीत, नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनेमध्ये तांत्रिक बिघाड हार्बर रेल्वे विस्कळीत, नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनेमध्ये तांत्रिक बिघाड
नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनचा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हार्बरची रेल्वे विस्कळी झाली आहे. गेली अर्धा ते पाऊण तास...
3 गुप्तचर विमानांसाठी मोजणार 10 हजार कोटी; आय-स्टार विमानाचा प्रस्ताव तयार, लवकरच मंजुरीसाठी मांडणार
कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा दिसणार सिद्धू
इराणमध्ये कुत्र्यांना घेऊन फिरण्यास बंदी
Sleeping Tips- रात्री शांत झोप येण्यासाठी, या 5 टिप्स फॉलो करा
शेअर बाजार उसळला, गुंतवणूकदारांची चांदी
कामाची बात! आयटीआर भरताना चुका टाळा