लेख – जागतिक सेमी कंडक्टर उद्योगात भारत

लेख – जागतिक सेमी कंडक्टर उद्योगात भारत

ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

सेमी कंडक्टर चिप उत्पादन भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल. सध्या सेमी कंडक्टरशिवाय कल्पनाही करता येत नाही. त्यासाठीच केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी सेमी कंडक्टर मिशन सुरू करण्याची घोषणा केली होती. आता सेमी कंडक्टरची निर्मिती करणाऱ्या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. लवकरच सेमी कंडक्टरचे व्यावसायिक उत्पादन केले जाईल आणि काही दिवसांत भारत या क्षेत्रातही महासत्ता बनेल.

सेमी कंडक्टर निर्मितीत भारताने सर्वाधिक प्राधान्य दिले असतानाच केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळातील बैठकीत सेमी पंडक्टच्या तीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांची किंमत 1.26 लाख कोटी आहे. सरकारकडून हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून यातील टाटा ग्रुपकडून एक प्रकल्प ढोलेरा गुजरात, दुसरा प्रकल्प मोरीगाव आसाम व सीजी पॉवरकडून साणंद गुजरात येथे बांधला जाणार आहे. 100 दिवसांच्या आत हे प्रकल्प सुरू होणार आहेत. प्रकल्प 91 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याने 20 हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

ढोलेरा गुजरातमधील टाटा इलेक्ट्रॉनिक प्रकल्प पॉवर चिप सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन तैवान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार आहे. प्रस्तावित प्रकल्प चांगल्या गुणवत्तेच्या 28 एनएम चिपची निर्मिती करणार आहेत. पाच हजार वेफर प्रति महिना क्षमतेची ही प्रकल्प निर्मिती आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘‘एका वेफरमध्ये पाच हजार चिपची क्षमता असते. यानुसार एका वर्षात हा प्रकल्प तीन दशलक्ष चिपची निर्मिती करणार आहे. या चिपच्या निर्मितीचा वापर संरक्षण, ऑटो, टेलिकॉम या क्षेत्रासाठी केला जातो.’’ डेव्हलपमेंट ऑफ सेमी कंडक्टर व डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इको सिस्टिम’ या कार्यक्रमांतर्गत या चिपची निर्मिती देशात केली जाईल. या कार्यक्रमासाठी सरकारकडून 76 हजार कोटींची मदत होऊन त्यातील 59 हजार कोटी रुपये या तीन प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत. 2030 पर्यंत जागतिक सेमी कंडक्टर उद्योग 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणि भारतीय सेमी कंडक्टरची मागणी 110 अब्ज डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे. सेमी कंडक्टर उत्पादनात भारताचा प्रवेश लक्षणीयरीत्या जागतिक पुरवठा साखळीत आणि जागतिक सेमी कंडक्टर उद्योगात भारताला एक महत्त्वाचा खेळाडू बनवेल. जूनच्या अखेरीस कॅबिनेटने मायक्रोन या सुरतमधील सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्पाला मान्यता दिली होती. भारताला सेमी कंडक्टर ग्लोबल हाऊस बनवण्यासाठी सरकारकडून या सेमी कंडक्टर गुंतवणुकीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा भागीदारी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा 2023 मध्ये करताच केंद्र सरकारच्या सेमी कंडक्टर योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. हा उद्योग अत्यंत स्पर्धात्मक असून तो यशस्वी होण्यासाठी पंपन्यांना नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जागतिक सेमी कंडक्टर बाजाराला चिप्सची कमतरता तसेच वाढत्या खर्चासह अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भारताचे सेमी कंडक्टर धोरण हा एक व्यापक कार्यक्रम आहे. डिसेंबर 2021 मध्ये धोरण जाहीर करण्यात आले होते. ज्याचा उद्देश भारताला सेमी कंडक्टर डिझाईन, उत्पादन, तसेच चाचणीसाठी जागतिक केंद्र बनवणे हा आहे. या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे व ज्या पंपन्यांना देशात सेमी कंडक्टर फॅब्सची स्थापना करायची आहे, त्यांना प्रोत्साहन देणे याचाही यात समावेश आहे. देशातच चाचणी सुविधा उभारणाऱया कंपन्यांना बळ देऊन चाचणी क्षमता विकसित करणे, प्रशिक्षण देऊन या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उभे करणे, हाही धोरणाचा एक भाग आहे. अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे. तथापि, सेमी कंडक्टर फॅब्स उभारण्याचा उच्च खर्च तसेच सेमी कंडक्टर इकोसिस्टमचा अभाव ही प्रमुख आव्हाने पंपन्यांसमोर आहेत. भांडवली सबसिडी, कर सूट, तसेच संशोधन आणि विकासासाठी निधी यासाठी म्हणूनच केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. सेमी कंडक्टर इकोसिस्टम विकासासाठी समर्थन देताना चाचणी सुविधांच्या विकासासाठी, कुशल कामगारांची निर्मिती, तसेच संशोधन विकासाला चालना दिली जात आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. हे धोरण यशस्वी झाले, तर भारत जागतिक उत्पादन केंद्र बनेल व या क्षेत्रात लक्षणीय रोजगार निर्माण करेल.

सेमी कंडक्टर आयात कमी व्हावी व चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. म्हणूनच भारतात सेमी कंडक्टरच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबरच पुरवठा साखळीची कार्यक्षमता कशी वाढेल याची काळजी सरकार घेत आहे. हे धोरण यशस्वीपणे राबवल्यानंतर देशामध्ये रोजगार तर मोठय़ा प्रमाणात निर्माण होणार आहे.

या क्षेत्रात ‘इंटेल’, ‘सॅमसंग’ आणि ‘टी एसएमसी’ यांसारख्या कंपन्या नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन व विकासासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करतात. चिप्सची कमतरता, वाढती किंमत आणि त्यांची वाढती जटिलता इ. आव्हानांचा या क्षेत्राला सामना करावा लागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, 5 जी, तसेच इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे या बाजारपेठेची मागणी वाढतच आहे. हे लक्षात घेऊनच सरकार सेमी कंडक्टरच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. या माध्यमातून सेमी कंडक्टरची जागतिक बाजारपेठ अशी भारताची ओळख जगात होणार आहे. आत्मनिर्भर भारताचा पुढील अध्याय सेमी कंडक्टरचाच आहे, यात कोणतीही शंका नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;