फडणवीस आणि मोदींचा विकास पहिल्याच पावसात गटांगळ्या खात आहे! संजय राऊत यांची टीका

फडणवीस आणि मोदींचा विकास पहिल्याच पावसात गटांगळ्या खात आहे! संजय राऊत यांची टीका

मुंबईत रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवघ्या दोन आठवड्यापूर्वी महायुती सरकारने उद्घाटन केलेल्या मेट्रोच्या अक्वा लाईनचा तर फज्जा उडाला आहे. वरळीतील मेट्रो स्थानकात पाणी भऱले आहे, तर स्थानकातील संरक्षक भिंत देखील कोसळल्याचे समजते. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने या घटनेचे रिपोर्टींग करायला आलेल्या पत्रकारांना देखील तेथे जाण्यापासून अडवले आहे. मेट्रो स्थानकातील परिस्थितीवरून सध्या महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील सोशल मीडियावर महायुती सरकावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांनी मेट्रो स्थानकातील पाणी भरलेला एक व्हिडीओ शेअर करत महायुती सरकारला फटकारले. ”फडणवीस आणि मोदींचा विकास पहिल्याच पावसात गटांगळ्या खात आहे! शेकडो कोटी बुडाले!”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;