ठसा – भाऊ काणे

ठसा – भाऊ काणे

>> महेश उपदेव

आपले पूर्ण आयुष्य क्रीडा क्षेत्रासाठी ज्यांनी वेचले ते प्रख्यात अॅथलेटिक्स प्रशिक्षक संजय ऊर्फ भाऊ काणे यांचे निधन अनेक होतकरू आणि नामांकित खेळाडूंना दुःख देऊन गेले. 75 व्या वर्षी भाऊ काणे यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे काम सुरू होते. वास्तविक ते स्टेट बँकेत नोकरी करणारे. मात्र त्यांचे मन रमत होते ते क्रीडा क्षेत्रातच. विशेषतः अॅथलेटिक्स प्रशिक्षण हा त्यांचा श्वास आणि ध्यास होता. या कामासाठी पूर्ण वेळ देता यावा यासाठी त्यांनी 2009 मध्ये स्टेट बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. यावरूनही भाऊ यांचे क्रीडा क्षेत्रावर असलेले प्रेम दिसून येते. भाऊ काणे गेल्या 35 वर्षांपासून सातत्याने उदयोन्मुख खेळाडू अॅथलीट घडविण्याचे कार्य करीत होते. असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू भाऊंनी घडविले. राज्यात शिवसेना-भाजप युती सरकार होते तेव्हा भाऊंना दादोजी कोंडदेव पुरस्कार देऊन गौरविले होते. 1995 ते 1998 पर्यंत ते महाराष्ट्र क्रीडा परिषदेचे सदस्य होते. नुकतीच त्यांची 75 वी साजरी करण्यात आली होती. त्यावेळी जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. खेळासाठी सर्वकाही असेच भाऊंचे आयुष्य होते. खेळाडू घडविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असे. प्रामुख्याने गरीब व होतकरू मुलामुलींना खेळाडू म्हणून घडविण्यावर त्यांचा भर असे. शिवाय खेळाबरोबर त्यांच्या शिक्षणाकडेही भाऊ विशेष लक्ष देत. त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी मोठय़ा हुद्दय़ांवर काम करीत आहेत. महाराष्ट्र क्रीडा मंडळातून बाहेर पडल्यावर त्यांनी नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाची स्थापना केली होती. खो-खोबरोबर अॅथलेटिक्सचे खेळाडू घडविले. नागपुरातून 11 आंतरराष्ट्रीय खेळाडू हे केवळ भाऊंच्या प्रशिक्षणाचे फळ म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता नायगावकर, अपर्णा भोयर, अर्चना पोटे, संगीता सातपुते, रश्मी भोयर, गायत्री बेदरकर, धनश्री चावजी यांच्यासारखे अॅथलीट नावारूपास आले ते भाऊंमुळे. उदयोन्मुख खेळाडूंना घडविण्याचे काम करताना भाऊ काणे यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आधुनिक क्रीडा साधनाची टंचाई भासली. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भाऊंनी निरंतर एका उत्तम आदर्श प्रशिक्षकाची भूमिका निभावली. त्यांच्या शिष्या चारूलता नायगावकरचा राज्य शासनाने 1990 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला. चारूने अनेक आंतरविद्यापीठ स्पर्धांत सुवर्ण पदक पटकावले. तिने जागतिक क्रॉस कंट्री स्पर्धत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. चारूच्या पाठोपाठ अपर्णा भोयरने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. 1992-93 मध्ये तिचाही शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संगीता सातपुतेलाही राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. अपर्णा भोयर हिच्या बहिणीने क्रॉस पंट्री स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली. 2001-02 मध्ये राज्य शासनाचा प्रतिष्ठsचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय मनोज बालपांडे, शंकर तुले, नीलेश चोपडे, योगेश ठाकरे या धावपटूंनी भाऊंच्या मार्गदर्शनात भरीव कामगिरी करीत राष्ट्रीय स्तरावर नागपूरचे नाव मोठे केले. खो-खोमध्ये सीमा सिर्सीकर, शुभदा झाडगावकर या दोघींनी राष्ट्रीय व आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मुळात भाऊ काणे स्वतः उत्तम खो-खो पटू होते. त्यांनी नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खो-खो खेळ जिवंत ठेवला. नागपूरचे दुसरे दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते सीताराम भोतमांगे सरांचा गेल्या वर्षी याच दिवशी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. एकाच वर्षात दोन क्रीडा महर्षी नागपूरने गमावले. भाऊ काणे यांच्या निधनाने अॅथलेटिक्स क्षेत्राला धक्का बसला आहे. भाऊ यांच्या निधनाने एक हाडाचा क्रीडा प्रशिक्षक, कौशल्य, जिद्द आणि परिश्रमातून उदयोन्मुख खेळाडूंना नामारूपाला आणणारा व्रतस्थ ऋषी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;