Mumbai Rain – सायन-पनवेल महामार्गावर एसटीचा अपघात, चालकाच नियंत्रण सुटलं आणि बस थेट…

Mumbai Rain – सायन-पनवेल महामार्गावर एसटीचा अपघात, चालकाच नियंत्रण सुटलं आणि बस थेट…

मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांसह सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या आणि मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच सायन-पनवेल महामार्गावर खारघरमध्ये चालकाच एसटीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही.

सायन-पनवेल महामार्गावर खारघरमधील हिरानंदानी उड्डानपुलावर बसचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडरला जाऊन आदळली. एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. घटनेचा माहिती मिळताच संबंधित अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Free Press Journal ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;