कोकणाताले तळवडे न्हावनकोंड, मणचे व्याघ्रेश्वर धबधबे प्रवाहित; पर्यटकांची गर्दी

कोकणाताले तळवडे न्हावनकोंड, मणचे व्याघ्रेश्वर धबधबे प्रवाहित; पर्यटकांची गर्दी

धुव्वाधार पडत असलेल्या पावसामुळे देवगड तालुक्यातील प्रमुख असलेले तळवडे न्हावनकोंड व मणचे व्याघ्रेश्वर हे पर्यटनाचा आकर्षणबिंदू ठरणारे धबधबे प्रवाहित झाले असून वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली आहे.रविवारी न्हावनकोंड धबधबा पर्यटकांनी फुलून गेला होता.

सतत पाच दिवस बरसणारा अवकाळी पावसामुळे नदीनाले, विहीरी पाण्याने भरून गेल्या आहेत. त्याचबरोबर धबधबेही प्रवाहित झाले आहेत.देवगड तालुक्यातील तळवडे येथील न्हावनकोंड धबधबा तसेच मणचे येथील व्याघ्रेश्वर धबधबा हे दोन धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. यावर्षी जुन अखेरीस अथवा जूलै सुरूवातील प्रवाहित होणारे हे धबधबे यावर्षी मे महिन्यातच जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने प्रवाहित झाले आहेत. मणचे न्हावनकोंड धबध्यावर रविवारी पर्यटकांनी गर्दी केली होती.

वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या धबधब्याकडे येत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांचा पर्यटन हंगाम संपण्याचा मार्गावर असला तरी वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली असून या पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या धबधब्यांकडे पर्यटकांची पाऊले पडू लागली आहेत. यामुळे धबधब्यांचा ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;