सुप्रीम कोर्टाने झापल्यावर तामीळनाडूच्या राज्यपालांनी पोनमुडी यांना दिली शपथ
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर शब्दांत कानउघाडणी करत घटनात्मक कर्तव्यांबद्दल झापल्यानंतर आज दुपारी तामीळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी द्रमुक नेते के. पोनमुडी यांना मंत्री पदाची शपथ देत राज्य मंत्रिमंडळात पुन्हा समावेश केला. राजभवनावरील एका साध्या समारंभात पोनमुडी यांना रवी यांनी पदभार आणि गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन, उदयनिधी स्टॅलीन, एम.ए. सुब्रमण्यम असे काही मंत्री उपस्थित होते. पोनमुडी यांच्याकडे उच्च शिक्षण मंत्री पद पुन्हा सोपवण्यात आले आहे. या शपथविधीमुळे स्टॅलीन आणि रवी यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List