सावधान! मुसळधार सरी कोसळणार, ‘सतर्क’चा अलर्ट

सावधान! मुसळधार सरी कोसळणार, ‘सतर्क’चा अलर्ट

आठवड्याची सुरुवातच दमदार पावसाने झालेली आहे, मुंबईत मुसळधार पावसानं पहाटेपासून हजेरी लावली आहे. पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या धर्तीवर ‘सतर्क’ने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या घडीला मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई तसेच उपनगरे, रायगड, ठाणे, पालघर, पुणे याठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली. याचबरोबरीने ग्रँट रोड येथे 36 मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्र आणि सी वॉर्ड कार्यालय येथे 35 मिमी, कोलाबा अग्निशमन केंद्र येथे 31 मिमी, बी वॉर्ड कार्यालय येथे 30 मिमी, मांडवी अग्निशमन केंद्र येथे 24 मिमी, भायखळा अग्निशमन केंद्र येथे 21 मिमी, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर येथे 18 मिमी आणि नायर हॉस्पिटल येथे 14 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाच्या धर्तीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील 3 ते 4 तासांत शहरातील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवली आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;