साध्वी प्रज्ञा सिंह यांची एनआयए कोर्टात हजेरी
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यात भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. वारंवार सुनावणीला गैरहजेरी लावल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. शुक्रवारी त्यांनी व्यक्तिशŠ हजेरी लावल्यानंतर न्यायालयाने वॉरंट रद्द केले.
साध्वी प्रज्ञा सिंह तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी न्यायालयात हजेरी लावून वॉरंट रद्द करून घेतले. न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी गेल्या आठवडय़ात जामीनपात्र वॉरंट बजावले होते आणि सुनावणीला व्यक्तिश: हजर राहण्याचे आदेश साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List