लोकसभा निवडणुकीमुळे  सीईटीच्या तारखांत बदल

लोकसभा निवडणुकीमुळे  सीईटीच्या तारखांत बदल

लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने परीक्षांच्या तारखांत बदल केला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या 8 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे. पीजीपी-/एम.एस्सी/एम.एमसी(पी अँड ओ) या सीईटीच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केले असून सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली एमएचटी सीईटी यापूर्वी 16 एप्रिलला होणार होती आणि 30 एप्रिलला संपणार होती. आता ही परीक्षा 22 एप्रिलनंतर होणार आहे. पीसीबी गटाची परीक्षा 22, 23, 24, 28, 29, 30 एप्रिल या तारखांना, तर पीसीएम गटाची परीक्षा 2, 3, 4, 5 मे, 9, 10, 11 मे, 15, 16 मे रोजी होणार आहे. एएसी सीईटीची त्याच तारखेला म्हणजे 12 मे रोजीच होणार आहे. बीए/बीएस्सी, बीएड (4 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स)ची सीईटी 2 मे रोजी होणार होती. ती आता 17 मे रोजी होणार आहे. एमएएचएलएलबी (पाच वर्षे) ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती. आता नव्या तारखेनुसार 17 मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रकांची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊनच परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;