पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला

पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर आज युव्रेनने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यातून पुतीन थोडक्यात बचावले. दरम्यान, रशियाने युव्रेनमधील अनेक भागांवर शेकडो ड्रोन्स डागले. त्यानंतर युव्रेनकडून पुतीन यांना लक्ष्य करण्यात आले.

रशियातील कुर्स्क भागातून पुतीन यांचे हेलिकॉप्टर जात असताना युव्रेनकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने पूर्ण ताकदीने युव्रेनच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देत पुतीन यांच्या उड्डाण मार्गात येण्यापूर्वीच ड्रोन नष्ट केले. या घटनेत कुणालाही दुखापत झाल्याचे किंवा राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील कुणाला काही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, रशियाच्या सुरक्षा यंत्रणांकडून या घटनेची पूर्ण चौकशी केली जात आहे. तसेच युव्रेनचे ड्रोन कुर्स्कसारख्या संवेदनशील भागात कसे पोहोचले याचाही शोध घेतला जात आहे.

रशियाने युव्रेनवर डागले 360 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे; 13 जणांचा मृत्यू

रशियाने आज पुन्हा एकदा युव्रेनवर ड्रोन हल्ल्यांचा मारा केला. हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. रशियाने युव्रेनवर तब्बल 360 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यामुळे युव्रेनमध्ये मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी झाली. या हल्ल्यात किमान 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात तीन मुलांचा समावेश असून अन्य बारा जणही जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;