तीन महिन्यांत होणारी नालेसफाई दोन महिन्यांत करण्याचे आव्हान

तीन महिन्यांत होणारी नालेसफाई दोन महिन्यांत करण्याचे आव्हान

मुंबईत मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणारी नालेसफाई या वर्षी तिसऱया आठवडय़ानंतर सुरू झाली असून हे काम 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट पालिकेने ठेवले आहे. त्यामुळे आधीच सुमारे वीस दिवस उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईचे तीन महिन्यांचे काम दोन महिन्यांत करण्याचे आव्हान पालिकेसमोर राहणार आहे. सद्यस्थितीत मोठय़ा आणि छोटय़ा नाल्यांची सफाई सुरू झाली असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या या पाणी निचरा होण्याच्या ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक वेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोटय़ा नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांमधील पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम हाती घेण्यात येते. दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला नालेसफाई सुरू केली जाते. मात्र 2022 मध्ये नालेसफाई 11 एप्रिल रोजी सुरू झाली होती.

यावेळी काम पूर्ण करताना पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. तर 2023 मध्ये 6 मार्चपासून नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र या वर्षी तिसऱया आठवडय़ानंतर काम सुरू झाल्यामुळे पालिकेने वेगाने काम करून टार्गेट गाठण्याचे आव्हान पालिकेसमोर राहणार आहे. दरम्यान, मिठी नदीचे काम सुरू झाले असून 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.

कंत्राटदाराला गाळाच्या वजनानुसार पैसे

पालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. कंत्राटदाराने काढलेल्या गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत. शिवाय पंत्राटदाराच्या कामावर नजर ठेवण्यात येईल.

नागरिकांना तक्रारीसाठी डॅशबोर्ड

आपल्या विभागातील नाल्यांच्या सफाईची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी पालिका डॅशबोर्ड सुरू करणार आहे. या डॅशबोर्डवर नागरिकांना नालेसफाईबाबतच्या तक्रारीही करता येणार आहेत. डॅशबोर्डवर नाल्याचा पह्टो टाकल्यास पालिका तातडीने कार्यवाही करणार आहे.

निवडणूक डय़ुटीमुळे कसरत

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचा सुमारे 50 हजारांहून जास्त स्टाफ जाणार आहे. त्यामुळे नालेसफाईसह सर्वच कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. देखरेखीसाठी मनुष्यबळाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईतील नाले
छोटे नाले 1508 (लांबी 605 किमी)
मोठे नाले 309 ( लांबी 290 किमी)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;