IPL 2024 : ऋतुराजच्या चेन्नईने मैदान मारलं, दुबे-जडेजाची तुफान खेळी

IPL 2024 : ऋतुराजच्या चेन्नईने मैदान मारलं, दुबे-जडेजाची तुफान खेळी

आयपीएलच्या सतराव्या हंगामाला चेन्नईच्या एम.चिन्नास्वामी स्टेडीअमवर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सलामीचा सामना चेन्नई विरुद्ध बंगळुरू यांच्यात रंगला. अटीतटीच्या लढतीत चेन्नईने बंगळूरुचा परभाव केला.

मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर नाणेफेकीचा कौल बंगळुरूने जिंकला. नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरूने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि ड्यु प्लेसिस ही ओपनिंगची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. दोघांनीही आक्रमक खेळ करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. चेन्नईसाठी घातक ठरत चालेली कोहली आणि ड्यु प्लेसिसची जोडी मुस्तफिजूरने फोडली. 41 या धावसंख्येवर बंगळुरूची पहिली विकेट ड्यु प्लेसिसच्या स्वरुपात पडली. कर्णधात ड्यु प्लेसिसने 8 चौकार ठोकत 35 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रजत पाटीदार आणि मैक्सवेल यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही. विराट कोहली (21), ग्रीन (18) यांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. अवघ्या 78 या धावसंख्येवर बंगळुरूचा अर्धा संघ तंबुत परतला होता. अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी केलेल्या संयमी खेळीमुळे बंगळुरूला 173 ही समाधानकारक धावसंख्या उभारता आली. अनुज रावतने 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. अनुजला अनुभवी कार्तिकने मोलाची साथ दिली. कार्तिकने 2 षटकार आणि 3 चौकरांच्या जोरावर 38 धावा केल्या. चेन्नईकडून मुस्तफिजूरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर वेगवान गोलंदाज चहरला 1 विकेट घेण्यात यश आले.

174 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. कर्णधार ऋतुराज 15 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहानेने रचिन रविंद्रच्या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चांगल्या लयीत असणाऱ्या रचिनला (37) करण शर्माने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. वेगवान गोलंदाज ग्रीनने बंगळुरूसाठी डोकेदुखी ठरत चालेलल्या अजिंक्य रहाणे (27) आणि मिचेल (22) यांना बाद करत सामना बंगळुरूच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला. 110 या धावसंख्येवर चेन्नईने 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर आलेल्या शिवम दुबे आणि रविंद्र जडेजाने संघाची सुत्र आपल्या हातात घेत विजयी खेळी केली. शिवम दुबेने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या तर, जडेजाने त्याला मोलाची साथ देत 25 धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. बंगळुरूकडून कॅमरुन ग्रीन 2 विकेट तर कर्ण शर्मा आणि यश दयाल यांना अनुक्रमे एक-एक विकेट मिळाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;