प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसने सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच प्रणिती शिंदे यांचे वाहन रोखून त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा काही तरुणांनी प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांचे गाव भेट दौरे सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात आल्या असता. गावातील काही तरुणांनी त्यांची गाडी अडवून वाद घातला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी गाडीतून उतरुन आक्रमक भूमिका घेतल्याने, अज्ञात तरुण शांत झाले.

गाव भेटी दरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, भाजपवाले अस्वस्थ झाले आहेत त्या नैराश्यातून हा हल्ला केला असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. ” माझ्यावर हल्ला करुन गाडी फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र हा त्यांना ते साध्य करता आला नाही, असे प्रणिती यानी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;