शंभर पोस्ट कार्डची अनोखी शक्कल लढवली, अन् खुनाचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला
दुसऱ्याच्या घरी चिकन बनवायला का घेऊन जातो यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून हॉटेल चालकाचा काटा काढल्याची कबुली मारेकऱ्याने नेवासा पोलिसांना दिली. त्यामुळे एका खुनाचा उलगडा करण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे. याबद्दल जनतेच्या वतीने पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
नेवासा तालुक्यातील कारवाडी पाचेगाव येथील हॉटेल ओम साई चे चालक बाळासाहेब सखाहरी तुवर यांचा 13 मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने डोक्यात टनक वस्तूने मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती. मृत व्यक्तीचा पुतण्या विष्णू गंगाधर तुवर याने नेवासा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. नेवासा पोलिसांसमोर खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी या कामी सहा पथके नियुक्त केली होती. तपास करण्यासाठी त्या पथकाने सुमारे 120 लोकांकडे चौकशी,तपासणी केली मिळालेल्या 34 प्रकारच्या माहितीवरून खुनाचा तपास सुरू केला होता.
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी कारवाडी, पाचेगाव परिसरात सुमारे 100 पोस्ट कार्डचे वाटप करून खून करणाऱ्यांची माहिती मागवली होती. या नामी युक्तीचा वापर यशस्वी झाला घटना स्थळाजवळच्या पेट्रोल पंपावरील रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सीसी टीव्ही फुटेजचे बारकाईने तपासणी केली असता तीस वर्ष वयाचा व्यक्ती एका श्वानाबरोबर आढळून आला. पोस्ट कार्डच्या नामी युक्ती मुळे गुन्हा उघडकीस आला. लोकांनी त्या पोस्ट कार्ड मध्ये सुदाम सूर्यवंशी या व्यक्तीने वैयक्तिक भांडणाकरिता खून केल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. त्यावरून नेवासा पोलिसांनी तपास करून त्या मारेकऱ्याच्या मुस्क्या आवळल्या. त्याने खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे. पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List