Arvind Kejriwal यांना सहा दिवसांची ईडी कोठडी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सहा दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली आहे. दिल्लीतल्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे.
Delhi court remands CM Arvind Kejriwal on judicial custody till 28 March in excise policy case. pic.twitter.com/BT4vHApO4o
— ANI (@ANI) March 22, 2024
अबकारी धोरणाशी संबंधित दोन तासांच्या चौकशीचा फार्स करून ईडीने रात्री उशिरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली . त्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अटकेनंतर ते पहिल्यांदाच समोर आले आणि प्रतिक्रिया व्यक्त केली. केजरीवाल यांनी सांगितलं की, मी तुरुंगात असो वा बाहेर असो, माझं जीवन देशासाठी समर्पित आहे. केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात आणले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
गुरुवारी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टाने नकार दिल्यानंतर ईडीचे पथक 10 वा समन्स आणि अटक वॉरंटसह केजरीवाल यांच्या निवासस्थानी सायंकाळी 7 च्या सुमारास पोहोचले. कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या चौकशीचे नाटय़ रंगले. आपचे कार्यकर्ते आणि केजरीवाल यांच्या समर्थकांनी निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले.
फोन काढून घेतला
चौकशी सुरू करण्यापूर्वी ईडीने केजरीवाल यांचा फोनही काढून घेतला. त्यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. निवासस्थानातील सर्व लँडलाईनही बंद करण्यात आले. आपचे कार्यकर्ते आणि केजरीवाल यांच्या समर्थकांनी मोदी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. कार्यकर्ते ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्त्यांचा आवाज आणखी वाढल्यावर पोलिसांनी अनेकांना अक्षरशः फरफटत व्हॅनपर्यंत नेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List