भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, मुंडे यांच्या दौऱ्याच्या वेळी आमदार राम शिंदे यांची दांडी
नगरमध्ये लोकसभेची भाजपची उमेदवारी सुजय विखे यांना जाहीर झाल्यानंतर पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू झालेले आहेत. शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे या नगर दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र त्यांच्या दौऱ्याच्या वेळी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी दांडी मारल्यामुळे एक प्रकारे शिंदे हे नाराज असल्याचे उघड झाले आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज नगरमध्ये आलेल्या होत्या. त्यांनी आज पाथर्डी या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी भाजपाचे उमेदवार सुजय विखे , माजी आमदार शिवाजीराव कर्डिले , आमदार मोनिका राजळे यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नगरमध्ये सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी दिसून आली होती. काही जण जाहीरपणे त्याबाबत वक्तव्य करत होते तर काहीजण दबक्या आवाजामध्ये बोलत होते. एकंदरीतच भाजपमध्ये काही आलबेल नाही असे यावरून दिसून येत आहे. आमदार राम शिंदे यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना अशा होती मात्र पक्षाने पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी दिली.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार राम शिंदे यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र तो प्रयत्न यशस्वी झालेला नाही हे यावरून दिसून आलेले आहे. आज राम शिंदे हे पाथर्डीला जातील अशी शक्यता होती मात्र ते त्या ठिकाणी गेले नाही एक प्रकारे त्यांची नाराजी असल्याचे पक्षांमध्ये बोलले गेले तर दुसरीकडे दोन दिवसापूर्वी ते जामखेड येथे सुजय विखे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी पण शक्यता होती मात्र त्या ठिकाणी सुद्धा ते गेले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List