त्यांना मला नग्नावस्थेत पाहायचे होते, कास्टिंग काऊचबाबत शिव ठाकरेचा धक्कादायक खुलासा

त्यांना मला नग्नावस्थेत पाहायचे होते, कास्टिंग काऊचबाबत शिव ठाकरेचा धक्कादायक खुलासा

मराठमोळा शिव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. तरुण वर्गामध्ये त्याची विशेष क्रेज पाहायला मिळत आहे. अशातचं त्याने एका पॉडकास्टमध्ये धक्कदायक खुलासा केला आहे.

‘बिग बॉसमध्ये आणि ‘झलक दिखला जा’ च्या 11 व्या सिझमनध्ये शिव ठाकरेने सर्वांना प्रभावित केले. त्यामुळे देशभरात त्यांच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. सध्या महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात त्याचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. अलीकडेच शिवने भारती आणि हर्षच्या पॉडकास्टवर आपला अनुभव शेअर केला. तेव्हा त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. “मुंबईच्या एका भागात माझ्यासोबत कास्टिंग काउच झाले. माझ्या एका मित्राला भुमिका मिळाली होती. त्यामुळे मी त्याच्यासोबत गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला सुद्धा भुमिकेसाठी विचारणा केली. तसेच करार करावा लागेल आणि त्यासाठी मला काही पैसे त्यांना द्यावे लागती अस सांगितलं,’अस शिवने पॉडकास्टमध्ये सांगितले.

“मी जर काम करणार आहे, तर मी तुम्हाला पैसे का देऊ? तेव्हा त्यांनी मला सांगितले की तुला पहिले 50 हजार रुपये द्यावे लागतील आणि नंतर करारावर सही करावी लागले. त्यानंतर आम्ही तुला दररोज 25 हजार रुपये देऊ. पण मी पैसे देण्यास नकार दिला. तुम्ही 15 दिवसांसाठी मला जे पैसे देणार आहात. त्यातले 25 हजार रुपये मी तुम्हाला देईन. कारण सध्या माझ्याकडे पैसे नाहीत,’ असा एक घडलेला प्रसंग शिव ठाकरेने यावेळी सांगितला.

त्यानंतर त्याने एका डिझायनरच्या बाबतीत आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले.”माझा बिग बॉस मराठी हा शो झाला होता. त्यामुळे मी एका मोठ्या डिझायनरकडे गेलो होते. त्याने मला जवळ बोलावले आणि कपड्याचे माप घेऊन शिवून देणार असे सांगितले. त्याचा हेतू मला नग्न अवस्थेत बघण्याचा होता. तो मला त्याच्या टीमकडे घेऊन गेला. तिथे एक मुलगा होता. पण त्याने मला कपडे दाखवले नाहीत. मी त्यांना कपडे दाखवायला सांगितले. पण त्यांनी नकार देत, आम्ही आता तुमचा स्पा करू असे सांगितले. तुम्हाला इथे सर्व काही मिळेल पण तुम्ही आधी स्पामध्ये आराम करा, असे सांगितले. त्यानंतर मी तिथे थांबलो नाही. त्यांनी मला मेसेज करुन परत येण्याची विनंती केली. पण मी त्यांना रिप्लाय दिला नाही. तेव्हा मला कोणीही काम देणार नाही, अशी धमकी देण्यात आलेली. कास्टिंग काउच फक्त मुलींसोबत घडत नाही. तर, मुलेसुद्धा त्याची शिकार ठरत आहे, असे शिवने यावेळी सांगितले,

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;